खासदार हेमंत पाटील यांनी केली प्रशासकीय व आरोग्य विभागाची पाहणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 26 March 2020

खासदार हेमंत पाटील यांनी केली प्रशासकीय व आरोग्य विभागाची पाहणी

खासदार हेमंत पाटील यांनी केली प्रशासकीय व आरोग्य विभागाची पाहणी







कोरोनाचा प्रादुर्भावाने संपूर्ण जग हादरलेले   असून भारतात खबरदारीचा उपाय म्हणून मागील काही दिवसांपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
31 मार्च आणि पुढील 21 दिवसासाठी देशात संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले असून ऊसतोड,शेतमजूर आणि हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाय योजनेची पाहणी करिता खासदार हेमंतभाऊ पाटील नांदेड येथील शासकीय रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील कोरोना उपचार कक्ष  आणि त्याबाबत आरोग्य  विभागाने केलेल्या उपाय योजना बाबत माहिती घेतली तसेच मतदारसंघातील


 किनवट (गोकुंदा),माहूर,हदगाव, हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयांना तातडीने औषध पुरवठा,कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत आणि या काळात काम करणाऱ्या आरोग्य ,प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना पी.पी.किट उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर ,उपजिल्ह्याधिकारी सचिन खल्लाळ यांच्याकडे केली.
तसेच सर्वसामान्य जनतेनी कोरोना रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन घराबाहेर पडण्याचे टाळावे व प्रशासनाला सहकार्य करावे.यावेळी खासदार हेमंतभाऊ पाटील समवेत नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर,जिल्हाप्रमुख उमेश मुंढे, डॉ.सोमेश्वर पतंगे आदी उपस्थित होते.









No comments:

Post a Comment

Pages