आदिवासी परिसरात 'हा' तरूण घेतोय गावक-यांची 'अशी' काळजी
किनवट : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला. बलाढ्या चिनपासून अमेरिकेपर्यत सर्वंच देशातवर कोरोनाचे सावट पसले आहे, भारतातही कोरोना रुग्णांची सख्या वरचेवर वाढतचं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देश २१ दिवस लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले. लॉकडाऊन काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जीवनावश्यक वास्तूंचा पुरवठा सुरळीत चालू असेल, नागिरकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही, असे सांगितले. मात्र, जीवनावश्यक वास्तूंची खरेदी करतांना सोशल डिस्टन्सींग ठेवणे ही गोष्ठ खुप महत्त्वाची आहे असेही ते म्हणाले.
नांदेड जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आतिदुर्गम आदिवासी किनवट तालुक्यातील लोणी (झेंडीगुडा) गावामध्ये सोशल डिस्टन्सींगचा अनोखा प्रयोग करण्यात आला. दरवेळी धान्य घेण्यासाठी राशन दुकानावर नागरिकांची तुंबळ गर्दी होते, त्यामुळे कोरोना व्हायरचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'सरकार मान्य, स्वस्त धान्य' दुकानदार सुभद्राबाई शामराव भालेराव यांचा तरुण सुशिक्षित मुलगा रोशन भालेराव यांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी दुकानाबाहेर सेनिटायझर ठेवले. हात स्वच्छ धुऊन, तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधुन दुकानात प्रवेश करण्याची विनंती केली. तसेच १ मीटर अंतरावर पांढरे पट्टे ओढण्यात आले, त्यामुळे गर्दी होणार नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे. सोशल डिस्टन्सींगची अनोखी शक्कल लढवुन रोशन हा तरुण आदिवासी गावक-यांची काळजी घेत आहे.
सोनिटायझर ठेवलेल्या ठिकाणी ग्राहकांसाठी ठळक अक्षरात एक सुचना लिहली आहे 'स्वस्त धान्य दुकाण लोणी, राशन कार्ड धारकांना महत्त्वाची सुचना- धान्य घेऊन जाण्याकरिता येत असतांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी हात स्वच्छ धुऊन व तोंडला रुमाल किंवा मास्क बांधून यावे. रांगेत १ मीटर अंतर ठेऊन उभे रहावे व गर्दी टाळावी' अशी नम्र विनंती ग्राहकांना केली आहे. ग्रामीन भागातील सोशल डिस्टन्सींगचा अनोखा प्रयोग पाहून तरुणाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
Thursday 26 March 2020
आदिवासी परिसरात 'हा' तरूण घेतोय गावक-यांची 'अशी' काळजी
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment