कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सेवानिवृत्त कर्मचा-यांनी एक दिवसाचे वेतन द्यावे - बाबूराव ओद्दीवार यांचे आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 27 March 2020

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सेवानिवृत्त कर्मचा-यांनी एक दिवसाचे वेतन द्यावे - बाबूराव ओद्दीवार यांचे आवाहन

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सेवानिवृत्त कर्मचा-यांनी एक दिवसाचे वेतन द्यावे - बाबूराव ओद्दीवार यांचे आवाहन

किनवट :  कोरोना ग्रस्तांच्या उपचारासाठी व या महामारीशी लढण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी ला देऊन शासनाची मदत करावी,असे आवाहन किनवट नगर परिषदेचे सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक तथा नगर परिषदेचे विद्यमान स्विकृत सदस्य व ज्येष्ठ नागरिक  बाबूराव ओद्दीवार यांनी सर्व सेवानिवृत्त कर्मचा-यांना केले आहे.


   प्रचंड वेगाने जगभरात कोरोनाव्हायरस पोहोचत असला तरी त्याला वेळीच रोखणे आपल्या हाती आहे. केंद्र व राज्य शासनाच्या, जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत त्याचे सर्व नागरिकांनी काटेकोर पालन करावे,असे आवाहनही श्री.ओद्दीवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages