कोरोना प्रतिबंध सहायता कोष सर्व अधिकाऱ्यांनी दिला एक दिवसाचा पगार, सर्वांनी धन, धान्य व इतर वस्तू स्वरूपात मदत करावी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 27 March 2020

कोरोना प्रतिबंध सहायता कोष सर्व अधिकाऱ्यांनी दिला एक दिवसाचा पगार, सर्वांनी धन, धान्य व इतर वस्तू स्वरूपात मदत करावी

कोरोना प्रतिबंध सहायता कोष    सर्व अधिकाऱ्यांनी दिला एक दिवसाचा पगार, सर्वांनी धन, धान्य व इतर वस्तू स्वरूपात मदत करावी




  किनवट  : जगावर थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेतच परंतु यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती संस्थांनी पुढे येऊन " कोरोना प्रतिबंध सहायता कोष किनवट " साठी धन, अन्न, धान्य व इतर आवश्यक ती मदत द्यावी, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
             किनवट उपविभागांतर्गत कोरोना प्रतिबंध उपाय योजनेचा सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल सर्व अधिकाऱ्यांचा नियमीत आढावा घेतात त्यावेळी संस्था वा समाजसेवींनी मदत करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केलेल्या आवाहनाचे सूत्र समोर ठेवून "कोरोना प्रतिबंध सहायता कोष किनवट " स्थापन करण्याचे सर्वानुमते ठरले. कोणतीही भिती न बाळगता दररोज अतिदूर्गम भागाचा दौरा करून नियोजनात सदैव व्यस्त असणारे  सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सर्वप्रथम स्वतःचा निधी या कोषासाठी दिला. त्यानंतर तहसीदार नरेंद देशमुख, सिध्देश्वर वरणगावकर, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, विशालसिंह चौहान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, डॉ.बी.एस. भिसे, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, विद्या कदम, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने आदिंसह किनवट व माहूर तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांनी एक दिवसाचा पगार या कोषासाठी दिला आहे.
             अनेक वेळा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी माणूसकीच्या नात्याने अनेक जन मदतीचा हात घेऊन पुढे येतात. परंतु काय द्यावे ?, कुठे द्यावे ? यापासून ते अनभिज्ञ असतात म्हणून दात्यांना सहज, सुलभ व्हावे याकरिता तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, किनवट येथे कक्ष स्थापन केला आहे. येथील आरोग्य कर्मचारी माणिक कुमरे ( 9665191584) व प्रभाकर पेंदोर ( 9422454170) यांचेशी संपर्क साधून दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था ( एनजीओ ) यांनी रोख रक्कम, जेवण, धान्य वा इतर आवश्यक वस्तू " कोरोना प्रतिबंध सहायता कोष किनवट " साठी देऊन सहकार्य करावे असे आवाहन तहसिलदार नरेंद्र देशमुख यांनी केले आहे. मदत देणारांच्या नावांची अद्यावत यादी दररोज समाज माध्यमावर प्रसारीत करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages