नायगाव : कोरोना साथीच्या रोगांवर प्रतिबंधक उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने संचारबंदी लागू केली असल्यामुळे देगाव(ता.नायगाव) येथील रोजमजूरी करणार्यांच्या कुटुंबावर भिषण संकट आले आहे.
त्यांना मदतीचा हात म्हणून प्रजासत्ताक पार्टीचे नायगाव तालुक्याचे नेते राहुल गायकवाड यांच्या वतीने अन्न धान्याची मदत करण्यात आली.
या वेळी राहुल गायकवाड, सुभाष गायकवाड, अंकुश देगावकर, संभाजी गायकवाड, संदीप कांबळे, गोविंद हते,किशोर मोरे, नितीन रोडे ,मोशीन शेख, सोनू शेख, मुबिन शेख,अविनाश गायकवाड, राम जिगळेकर,संभाजी मोरे, अजीज शेख, उत्तम पवार,अमोल, संतोष यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment