खासदार व आमदारां चे वेतन पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याची 'मासु'ची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 27 March 2020

खासदार व आमदारां चे वेतन पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याची 'मासु'ची मागणी

खासदार व आमदारां चे वेतन पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याची 'मासु'ची मागणी



मुंबई : महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन  (मासु) ने दिनांक २५ मार्च  रोजी ट्विटर आणि ई-मेल च्या माध्यमातून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्वाच्या सूचना व आवश्यक उपाययोजना संदर्भात निवेदन करून आमदार आणि  खासदार यांचा एक महिन्याचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्याची सूचना वजा मागणी 'मासु' चे सहसचिव दादाराव नांगरे यांनी केली होती.


   या निवेदनातील सुचनेची गांभीर्याने दखल घेत शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार  संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार यांचा एक महिन्याचे वेतन  मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देण्याचे  घोषित केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा व राज्यसभा खासदार शरद पवार यांनीही एका पत्राद्वारे विधानसभा, विधानपरिषद आमदार यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीस तसेच राज्यसभा आणि लोकसभा खासदार यांचा एक महिन्याचे वेतन प्रधानमंत्री  साहाय्यता निधीस देण्याचे घोषित केलेले  आहे.

No comments:

Post a Comment

Pages