किनवट/माहूर प्रतिनिधी— कोरोना (कोव्हीड १९) संक्रमीत महामारीच्या पार्श्वभूमीवर किनवट व माहूर तालुका प्रशासनाने सजग राहून कर्तव्य पार पाडावे. नागरीकांनी सुद्धा आपली जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले.
कोरोना आजारा संदर्भात घ्यावयाची काळजी व त्यावरील उपाययोजनेसाठी सर्वस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. अन्नधान्याचे वाटप करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून, खेड्यापाड्यापर्यंतचा एकही राशनकार्ड धारक वंचित राहाणार नाही, याची सर्वतोपरी संबंधितांनी खबरदारी घ्यावी. ज्यांच्याकडे राशनकार्ड नसेल अशाही व्यक्ती, कुटूंब या काळात अन्नधान्यापासून सूटला नाही पाहिजे असे खासदार पाटील म्हणाले.
कोरोना विषाणू (कोव्हीड १९) या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला सर्वांनी सूचनांचे पालन केल्याचे चित्र पहायला मिळत असल्याबद्धल त्यांनी समाधान व्यक्त केले. विशेष करुन होम कोरोन्टाईंन्सच्या नागरीकांनी आपल्या घरीच कुटूंबात वेळ घालवावा, बाहेर फिरु नये. बाहेरच्या जिल्ह्यातून, परप्रांतातून व परराज्यातून आलेल्यांनी वैद्यकीय चाचणी करुन, स्वत:सह कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. शिवाय संबंधित यंत्रणेनेही तशा व्यक्तींवर बारकाईने लक्ष देण्याचे सूचीत केले आहे.
Friday 27 March 2020
नागरीकांनी सुद्धा आपली जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करा -खासदार हेमंत पाटील .
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment