हिंगोली मध्ये सैन्य भरती घ्यावी खासदार हेमंत पाटील यांनी केली केंद्रीय संरक्षण मंत्र्यांकडे मागणी -------------------------- - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 7 March 2020

हिंगोली मध्ये सैन्य भरती घ्यावी खासदार हेमंत पाटील यांनी केली केंद्रीय संरक्षण मंत्र्यांकडे मागणी --------------------------







हिंगोली मध्ये सैन्य भरती घ्यावी खासदार हेमंत पाटील यांनी केली केंद्रीय संरक्षण मंत्र्यांकडे मागणी
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हिंगोली : मराठवाड्यातील सैन्य दलातील भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी मराठवाडा विभागातील भरती हिंगोली      येथे घेण्यात यावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे  केली .
            ग्रामीण भागातील तरुणांमध्ये देशसेवा करण्याची आवड मोठ्या प्रमाणात असते त्यात मराठवाडा, विदर्भ, सुद्धा मागे नाही सैन्यातील विविध बटालियन मध्ये मोठ्या प्रमाणात   हिंगोली, नांदेड, यवतमाळ, परभणी आणि लातूरच्या तरुणांचा समावेश असतो. सैन्य भरतीकडे  युवकांचा कल  दिवसेंदिवस वाढत आहे , सैन्य दलातील भरतीसाठी मराठवाड्यातील मुलांना सोयीचे व्हावे, यासाठी औरंगाबाद सैन्य भरती विभागा अंतर्गत मराठवाडा,विदर्भ आणि खानदेश मधील 9 जिल्हयांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाते यामध्ये हिंगोलीचा समावेश सैन्य भरती ठिकाणामध्ये करण्यात यावा, जेणेकरून मराठवाड्यासह विदर्भातील  युवकांना सुद्धा याचा फायदा होईल अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे, महाराष्ट्रात भरतीसाठी एकूण १५ ठिकाणे निश्चित केली असून, त्यापैकी पाच ठिकाणी दरवर्षी भरती प्रक्रिया राबविली जात असते. . सैन्य भरती करणार्याय उमेदवारांना  या विषयी अधिक माहिती व्हावी तसेच ही भरती प्रक्रिया राबविणे सुकर व्हावे, यासाठी सैन्य दलाने मराठवाड्यात दर तीन वर्षांनी भरती घेण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी औरंगाबाद आणि परभणी ही दोन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत़ तसेच जळगाव येथे सुद्धा प्रत्येक तीन वर्षाला भरती घेतली जाते . परभणी येथे जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या भरतीसाठी एकूण ६५ हजार युवकांनी अर्ज केले होते ,त्यापैकी २८ हजार युवकांची शारीरिक चाचणी घेण्यात आली होती . एवढ्या मोठ्या प्रमाणात युवक एकाच शहरात भरतीसाठी येत असल्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत होऊन प्रशासनाला त्रास होऊ नये व भरती प्रक्रिया सोयीची व्हावी यासाठी नियोजित १५ ठिकाणांमध्ये आणि मराठवाड्यातील ठिकाणांमध्ये हिंगोली जिल्ह्याचा समावेश करण्यात यावा असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले .

No comments:

Post a Comment

Pages