जागतिक महिला दिना निमित्त महिलांचा गौरव
किनवट : जागतिक माहिला दिनाचे औचित्य साधून उल्लेखनीय क्षेत्रात काम करणाऱ्या माहिलांचा गौरव करण्यासाठी 'सन्मान नारी शक्तीचा' हा कार्यक्रम आज(दि.८) घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन साठे नगर, प्रभाग क्रमांक २ येथील समता विद्यालय येथे पोलिस प्रशासन ,नगर सेवीका अनुसया मधुकर अन्नेलवार व मा.उपाध्यक्ष तथा नगर सेवक श्रीनीवास नेम्मानीवार यांनी आयोजन केले होते .
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक , पोलीस निरीक्षक मारोती थोरात , जेष्ठ विधीज्ञ अॅड .के.के . साबळे, समता प्राथमिक विद्यालयाचे संचालक दादाराव कयापाक, आमदार प्रतिनिधी संतोष मरस्कोल्हे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थीत होते .कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावीत्रीबाई फुले ,रमाबाई आबेंडकर, अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतीमेची पुजा करण्यात आली.
डॉ .वंदना पत्की यांनी माहिला दिना निमित्त मार्गदर्शन केले. तसेच कोरोना व्हायरस बद्दल माहिती सांगीतली.अॅड .के .के. साबळे यांनी महिला संबधीत कायदे व संविधानातील कलमे समजावुन सांगितली.
यांनतंर उल्लेखनीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या माहिलांचा गौरव करण्यात आला.वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणाऱ्या डॉ . .वंदना पत्की, महिलांसाठी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या गृहलक्ष्मी माहिला ग्रामविकास संस्थेच्या अध्यक्षा संगिता पाटिल , जनकल्याण नागरी पतसंस्थेच्या उपाध्यक्षा वंदना तिरमनवार, सहशिक्षीका फरहिन जाफर , सहाशिक्षीका संगीता पडवळे, पोलिस कॉन्स्टेबल अनिता कावळे, पो .कॉ. अनिता गजलवार , सभापती महिला व बालकल्याण पुजा धोत्रे, सुहासीनी श्रीनिवास नेम्मानीवार ,प्रमीला हटकर , पुनम दिक्षीत , नगर सेवीका जिजाबाई मेश्राम यांच्या सह नगर पालीका महिला सफाई कामगार यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. कार्यकमाचे सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निखील कावळे, शुभम भवरे, रवी दिसलवार, गौरव इटकेपेल्लीवार यांनी पुढाकार घेतला.
Sunday, 8 March 2020

जागतिक महिला दिना निमित्त महिलांचा गौरव
Tags
# तालुका
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment