कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 29 March 2020

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

 नांदेड : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नांदेड येथील दोघांनी आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे  1 लाख 44 हजार 877 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
ओमकार कंट्रक्शनचे दादाराव ढगे यांनी 1 लाख 11 हजार रुपये तर रामदास होटकर यांनी आपल्या पेन्शन मधून 33 हजार 877 रुपये देणगीचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिला. त्यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी हा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना सुपूर्द केला. यावेळी माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, पुरवठा अधिकारी शरद मंडलिक आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages