कोरोना विरुद्धच्या लढ्याला मदत करण्यासाठी पी एम केयर फंडात खासदार निधीतून 1 कोटी आणि मुख्यमंत्री फंडात दोन महिन्याचे वेतन देणार - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 29 March 2020

कोरोना विरुद्धच्या लढ्याला मदत करण्यासाठी पी एम केयर फंडात खासदार निधीतून 1 कोटी आणि मुख्यमंत्री फंडात दोन महिन्याचे वेतन देणार - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा

मुंबई दि. 29 - कोरोना विरुद्धचा  लढा लढण्यासाठी  पी एम केयर फंडात मदत करण्याचे जाहीर आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे तसेच राज्यसभेचे उपसभापती उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यसभेचे खासदार म्हणून आपल्या  खासदार निधीतून 1 कोटींचा निधी पीएम केयर फंडात  आणि दोन महिन्यांचे वेतन महाराष्ट्राच्या  मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देत असल्याची  घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज केली आहे.

 कोरोना विरुद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी जनतेने जनता कर्फ्यु यशस्वी केला पाहिजे. घरीच राहून कोरोनाचा मुकाबला केला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनानुसार आपल्याला जमेल तेव्हढी रक्कम पी एम केयर फंडात  मदत म्हणून जमा करावी. कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी आर्थिक मदती ची गरज लागणार आहे. त्यामुळे आपण खासदार निधीतून 1 कोटी पीएम रिलीफ फंडात आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दोन महिन्यांच्या  वेतनाचे  4 लाख रुपये देत असल्याचे आज ना.रामदास आठवले यांनी जाहीर केले.

कोरोना विरुद्ध च्या लढ्याला यशस्वी करण्यासाठी लॉकडाऊनच्या  पंतप्रधानांच्या अवहनाला आपण घरीच राहून यशस्वी केले पाहिजे. याकाळात अडचणीत आलेल्या हातावर पोट असणाऱ्या मजुरांना जमेल तिथे भोजन व्यवस्था सामाजिक संस्थांनी केली पाहिजे. यात रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. सोमवार दि. 30 मार्च पासून बांद्रा येथील संविधान निवासस्थानाजवळ दररोज 100 गरजूंना भोजनदान करण्यात येणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी आज जाहीर केले.
कोरोना विरुद्ध च्या लढाईला यशस्वी करण्यासाठी आज च्या बिकट स्थितीत तरुणांनी रक्तदान करण्याची गरज आहे. रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी  आज केले.

No comments:

Post a Comment

Pages