रविवारी राज्यात कोरोनाचे २२ रुग्ण आढळले,एकूण बाधितांची संख्या झाली २०३ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 30 March 2020

रविवारी राज्यात कोरोनाचे २२ रुग्ण आढळले,एकूण बाधितांची संख्या झाली २०३

मुंबई : राज्यात रविवारी एकाच दिवशी कोरोनाच्या २२ नवीन रूग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २०३ झाली आहे. तर दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात रविवारी २ कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. एका ४० वर्षीय महिलेचा काल केईएम रुग्णालयात तीव्र श्वसनावरोधामुळे मृत्यू झाला होता. ती कोरोना बाधित असल्याचे आज स्पष्ट झाले. तिला उच्च रक्तदाबही होता. बुलढाणा येथे एका ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू कोरोनामुळे झाला, तो मधुमेही होता. राज्यातील कोरोना बाधित एकूण मृत्यूची संख्या आता ८ झाली आहे.

राज्यात  रविवारी एकूण ३९४ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ४२१० जणांना भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ३४५३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर २०३ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात १७ हजार १५१  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ९६० जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत ३५ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामध्ये मुंबई- १४, पुणे- ७, पिंपरी चिंचवड- ८, यवतमाळ-३, अहमदनगर- १, नागपूर- १, औरंगाबाद- १ या रुग्णांचा समावेश आहे.

सर्वाधिक रूग्ण मुंबईचेः  राज्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधितात सर्वाधिक ८५ रुग्ण मुंबईचे आहेत. त्या खालोखाल पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) ३७, सांगली २५, मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा २३, नागपूर १४, यवतमाळ  ४, अहमदनगर ५, सातारा  २, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोंदिया, जळगाव, बुलढाणा प्रत्येकी १, इतर राज्य- गुजरात १ असे  एकूण २०३ कोरोनाबाधित रुग्ण झाले

No comments:

Post a Comment

Pages