किनवट : कोरोना विषाणूच्या संबंधाने संपुर्ण देशात लॉकडाऊन सुरू असल्याच्या पार्श्वभुमिवर किनवट व माहूर तालुक्यातील जनतेला अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आमदार भीमराव केराम यांनी किनवट व माहूर च्या तहसीलदारांना दिल्याआहे. याबाबत तात्काळ संबंधितांना सूचित करणेबाबत सूचना कराव्यात, असे लेखी पत्राद्वारे त्यांनी कळविले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर सुरू असलेले लॉकडाऊन ग्रामीण भागात १०० टक्के यशस्वी रित्या पार पडत आहे. यादरम्यान अखंडीत विजसेवेसह आरोग्य सुविधा (घरपोच आजारावरील औषधी), पाणी पुरवठा (ग्रामीण व शहरी) , टंचाई ग्रस्त गावनिहाय उपाय योजना इत्यादी सुविधा मिळणे अत्यंत गरजेचे असल्याने नागरीकांना वरील सर्व सुविधा निरंतर मिळाव्यात व अखंडीत लाभ मिळण्यासाठी संबंधित विभागांना आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार भीमराव केराम यांनी किनवट व माहूर तहसीलदारांना दिल्या आहेत.
Monday, 30 March 2020

Home
तालुका
लॉकडाऊन कालावधीत जनतेला अत्यावश्यक सुविधा पुरवा - आमदार केराम यांच्या तहसीलदारांना सूचना
लॉकडाऊन कालावधीत जनतेला अत्यावश्यक सुविधा पुरवा - आमदार केराम यांच्या तहसीलदारांना सूचना
Tags
# तालुका
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment