कोवीड-19 च्या अनुषंगाने किनवट व माहूरच्या ग्रामीण रूग्णलयांना यंत्र सामग्रीसाठी तात्काळ निधी द्या - आ. केराम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 30 March 2020

कोवीड-19 च्या अनुषंगाने किनवट व माहूरच्या ग्रामीण रूग्णलयांना यंत्र सामग्रीसाठी तात्काळ निधी द्या - आ. केराम

किनवट :  कोवीड -19 च्या पार्श्वभुमीवर किनवट व माहूर येथील ग्रामीण रूग्णालयांना वैद्यकीय यंत्रसामग्री व साहीत्य खरेदीसाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत ४० लक्ष रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करून देण्याच्या लेखी सूचना आ.भीमराव केराम यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना लेखी पत्राद्वारे दिल्या आहेत.
   वर्तमान स्थितीत भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'कोरोना' विषाणू चा उद्रेक पाहता या विषाणूच्या प्रकोपात लक्षणीय वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. यावर तात्काळ नियंत्रण करण्यासाठी व विषाणूंची वाढ थांबविण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आदिवासी बहूल किनवट व माहूर तालुक्यातील जनतेला यासंबंधातील संसर्ग परिस्थितीत येथील रूग्णालयात पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी किनवट व माहूर येथील दोन्ही ठिकाणच्या ग्रामीण रूग्णालयातील यंत्रसामग्री व साहीत्य खरेदीसाठी प्रत्येकी २० लक्ष या प्रमाणे ४० लक्ष रूपयांचा निधी  तात्काळ मंजूर करावा, अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना लेखी पत्राद्वारे  केली आहे.

No comments:

Post a Comment

Pages