दोनशे कामगारांच्या घरी पोहचविले राशन सम्राट अशोक संस्थेचे कार्य - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 30 March 2020

दोनशे कामगारांच्या घरी पोहचविले राशन सम्राट अशोक संस्थेचे कार्य

दोनशे कामगारांच्या घरी पोहचविले राशन
  सम्राट अशोक संस्थेचे कार्य



   नागपूर : कोरोना विषाणू उद्रेकाचा मोठा फटका रोजंदारी कामगार आणि घरकाम करून घर चालविणाऱ्या महिलांना बसला आहे.परिस्थिती बिकट आहे आणि अशावेळी या कामगारांच्या कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून काही सामाजिक संस्था मदतीचा हात पुढे करीत आहेत .प्रियदर्शनी सम्राट अशोक बहुद्देशीय संस्थेच्या तरुण कार्यकर्त्यांनीही मदतीचा हात पुढे करीत वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जवळपास दोनशे कुटुंबांपर्यंत रेशन पोहचविण्याचे काम केले आहे .


   संस्थेचा अनिकेत कुत्तरमारे याच्या मार्गदर्शनात २० ते २५ तरुणांनी दोन-दोनच्या टीम तयार करून कामगारांच्या घरा पर्यंत धान्य पोहचविण्याचे कार्य हाती घेतले .यात ३ किलो तांदूळ,एक किलो डाळ, आणि मसाल्याचे पॅकेट्स तयार करून गरीब आणि गरजू कामगारांपर्यंत पोहचविण्याचे काम हाती घेतले. तरूणांनी पहिल्या दिवशी दहीबाजार जवळच्या एका वस्तीत ३० मजुरांच्या घरी रेशन पोहचविले .त्यानंतर रामबाग वस्तीत ७० मजुरांच्या घरी धान्याचे  पॅकेट्स पोहचविले .शनिवारी या तरुणांनी सावित्रीबाई फुलेनगर झोपडपट्टी व आसपासच्या भागात जवळपास १०० कामगारांच्या घरी धान्य पोहचविले .याशिवाय मेडिकल ,मेयो रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक आणि रेल्वे स्टेशन व बसस्टँडवर अडकलेल्या प्रवाश्यांना १४ एप्रिल पर्यंत अन्नदान करण्याचे कामही हे तरुण  आहेत.मदत  करत असताना  अंतर व सुक्षिततेच्या सर्व अटीही पाळल्या जातात आहे .

No comments:

Post a Comment

Pages