खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कापसाची पुन्हा खरेदी सुरु; शेतक-यांना मिळाला दिलासा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 18 March 2020

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कापसाची पुन्हा खरेदी सुरु; शेतक-यांना मिळाला दिलासा

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कापसाची पुन्हा खरेदी सुरु; शेतक-यांना मिळाला दिलासा


किनवट : शेतक-यांकडे कापूस शिल्लक असतांना देखिल १९ फेब्रुवारी पासून चिखलीफाट्यावरील सी.सी.आयची कापूस खरेदी अचानक बंद केल्याने शेतकरी हवालदील झाला होता. शेतक-यांनी खासदार हेमंत पाटलांकडे दाद मागितली. खा.पाटलांच्या प्रयत्नामुळे १७ मार्च पासून कापूस खरेदी सुरु करण्यात आल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला, हे विशेष.
          किनवट  विधानसभा मतदारसंघात चिखली ( बु.ता.किनवट)फाट्यावरील खाजगी जीनिंगमध्ये सी.सी.आय.चे कापूस खरेदी केंद्र चालु होते. हजारो क्विंटल कापसाची खरेदीही करण्यात आली. अशातच शेतक-यांकडे हजारो क्विंटल कापूस पडून असतांना देखिल अचानकच चक्क खरेदीच बंद केली. बंदच्यापुर्वी व दरम्यानच्या  काळात जवळपास ४४५ शेतक-यांनी आपली नावे नोंदनी केली. शिवाय
१७ मार्च पासून खरेदी चालु झाल्यानंतर १५४ शेतक-यांनी नोंदनी केली. २० हजार क्विंटल कापूस या सी.सी.आय.च्या खरेदी केंद्रावर येण्याची शक्यता संबंधितांनी व्यक्त केली.
           खासदार हेमंत पाटलांकडे कापूस उत्पादक शेतक-यांनी कैफियत मांडली. त्यावरुन खासदार पाटलांनी औरंगाबाद काॅटन काॅर्पोरेशनचे आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक दास यांच्याकडे २८ फेब्रुवारी रोजी पत्रव्यवहार केला. सदर पत्राची दासांनी दख्खल घेत कापूस खरेदीचे आदेश दिले आहेत. दोन दिवसापासून कापसाची आवक सुरु झाली असून चिक्कार गर्दी दिसत आहे. खासदार पाटलांच्या प्रयत्नामुळेच ही खरेदी चालु झाली आहे. शेतक-यांना दिलासा देण्याचे काम खासदार पाटलांनी केले आहे. जवळपास २० हजार क्विंटल कापसाची खरेदी होऊ शकेल असा विश्र्वास कृषी उत्पन्न बाजार समितिच्या संबंधितांनी व्यक्त केला आहे. शेतक-यांनीही आपला कापूस खरेदी केंद्रावर आणून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जीनिंगचे व्यवस्थापक किशनराव कल्हाळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages