7 मार्च रोजी मांडवी येथे स्व. माजी खासदार उत्तमरावजी राठोड व स्व. उमामाई राठोड यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य मोफत नेत्र रोग निदान शिबीर आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 5 March 2020

7 मार्च रोजी मांडवी येथे स्व. माजी खासदार उत्तमरावजी राठोड व स्व. उमामाई राठोड यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य मोफत नेत्र रोग निदान शिबीर आयोजन

7 मार्च रोजी मांडवी येथे स्व. माजी खासदार उत्तमरावजी राठोड व स्व. उमामाई राठोड यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य मोफत नेत्र रोग निदान शिबीर आयोजन

किनवट प्रतिनिधी-
मांडवी येथे स्व. माजी खासदार उत्तमरावजी राठोड साहेब व स्व. उमामाई राठोड यांच्या स्मृती प्रित्यर्थ, इंदिराबाई राठोड ट्रस्ट, मांडवी आणि डॉ. एल. व्ही. प्रसाद (हैदराबाद) आदिलाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने , " भव्य मोफत नेत्र रोग निदान शिबीर " आयोजित करण्यात आले आहे.
            या प्रसंगी तज्ञ डॉक्टरांचा समूह येणार आहे.  दिनांक 07/03/2020,शनिवार.स्थळ   :सरस विद्यालय मांडवी,ता.किनवट,जि.नांदेड.वेळ : सकाळी 8 ते 10 वाजे पर्यंत नोंदणी.प्रत्यक्ष तपासणी : 10 ते 03 वाजे पर्यंत. पडदा, मोती बिंदु, काच बिंदु, पाणी वाहणे, जळजळ करणे, खाजविणे ,दृष्टी दोष ,कमी दिसणे ईत्यादी बाबीची मशिनद्वारे तपासणी करून योग्य ते रोग निदान करण्यात येणार आहे.
            रूग्णांना त्यांच्या आजाराचे स्वरूप पाहून आवश्यकते नुसार, बळीराम पाटील ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. श्री. विक्रम राठोड यांच्या वतिने मोफत गोळ्या औषधी, ड्रॉप्स देण्यात येणार आहे.
             त्याच बरोबर गरजू रूग्णांना त्यांच्या नंबर नुसार सरस विद्यालय संपूर्ण शिक्षक वृंदांच्या वतिने मोफत चश्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
            तरी परिसरातील सर्व गरजू रूग्णांनी ,जनतेनी आवश्य या संधीचा लाभ घ्यावा.आपण यावे व सोबत ईतरांनाही सांगावे.असे आवाहन आयोजक सर्व पदाधिकारी व सदस्य इंदिराबाई राठोड ट्रस्ट व सरस (मराठी व इंग्रजी माध्यम ),उच्च माध्यमिक विद्यालय, मांडवी,ता.किनवट,जि.नांदेड.व डॉ. वसंत भा. राठोड, सरस मांडवी, किनवट यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages