मांडवी वनपरिक्षेत्रा अंतर्गत छापेमारीत 15 हजारांचे सागवान जप्त
मुद्देमालासह आरोपीस अटक
मांडवी : मांडवी वन परिक्षेत्रा अंतर्गत काल(दि.५) मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मांडवी येथील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मुकेश अरविंद शेंडे राहणार मांडवी यांच्या घरावर छापेमारी केली असता मुकेश शेंडे यांच्या घरासमोरील छपरीत अवैद्य सागी कट नगाचे काम करीत असताना आरोपीस रंगेहात पकडण्यात आले.
मुकेश अरविंद शेंडे, रा. मांडवी व त्याचे दोन सहकारी हरिचंद्र भिकू जाधव आणि किशोर हरिचंद्र जाधव रा.मांडवी यांना ताब्यात घेण्यात आले मुद्देमाल सागी नग०५, घ.मि. 0.२०८२ कीमत १५ हजार चा माल जप्त करण्यात आला. आरोपीवर भा.व.अ.1972चे कलम,69,52(1) 41 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जप्त मुद्दे माल व आरोपी यांना वनपरिक्षेत्र कार्यालय मांडवी येथे हजर करण्यात आले.
गुप्त माहिती मिळाल्यावरून वनपरिक्षेत्र कार्यालय मांडवी व व्ही. एन. गायकवाड़, सहाय्यक वनरक्षक (जंकास व कॅम्प) ,किनवट,
वनपरिक्षेत्र अधिकारी मांडवी अविनाश तायनाक यांच्या मार्गदर्शनाखाली. मांडवी वनपाल एम.बी. राठोड, वनरक्षक श्री. डहाके, वनरक्षक श्री.शिरसागर, वनरक्षक श्री. भोगे, वनरक्षक श्री. गमे वन कर्मचारी व मजूर श्री.भगत, वनमजूर श्री.श्याम चव्हाण व इतर कर्मचारी या सागवान कटाई छापेमारी मध्ये सहभागी झाले होते.
Friday, 6 March 2020

मांडवी वनपरिक्षेत्रा अंतर्गत छापेमारीत 15 हजारांचे सागवान जप्त मुद्देमालासह आरोपीस अटक
Tags
# तालुका
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment