आधुनिक साहित्य पुरवठ्याने आदिवासी आश्रम शाळां, वसतीगृहांचा प्रकल्पाधिकारी अभिनव गोयल यांनी केला कायापालट
किनवट : प्रकल्पाधिकारी अभिनव गोयल यांच्या सूक्ष्म नियोजनातून कायापालट अभियान राबवून उपलब्ध करून दिलेल्या दर्जेदार साहित्याने विद्यार्थी निवासालये अत्याधुनिक झाल्याने आदिवासी विद्यार्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट (जि . नांदेड) या प्रकल्पातंर्गत 16 शासकीय आश्रम शाळा , एक एकलव्य रेसिडेंसियल मॉडेल स्कुल , 15 शासकिय आदिवासी मुलींचे व मुलांचे वसतीगृहे कार्यरत आहेत. शासकीय आश्रम शाळांमध्येसुमारे 6036 विद्यार्थी, वसतीगृहात 1293 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सन - 2018 - 19 या शैक्षणिक सत्रात आश्रम शाळा - वसतीगृहांचा दर्जा उंचाविण्यासाठी ' कायापालट अभियान ' राबविण्यास आदिवासी विकास विभागाने सुरुवात केली.
त्यानुसार प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल (भाप्रसे ) यांनी प्रकल्पातंर्गत शाळा व वस्तीगृहात सध्या उपलब्ध भौतिक सुविधांची तपासणी करुन त्यानुसार तेथील प्राथमिक आवश्यकता जाणुन घेऊन त्याचा सुक्ष्ममपणे केलेला सर्वेक्षण अहवाल शासनास सादर केला. शासनाने ठरविलेल्या धोरनानुसार शाळा इमारत , निवासव्यवस्था , फर्निचर व्यवस्था , बेडिंग साहित्य , ई . बाबतीत पुरवठा करणेसाठी मंत्रालय स्तरावर सर्वेक्षणासाठी प्रकल्प निहाय समित्यास्थापन करुन त्यांचे मार्फत प्रत्येक शाळा वसतीगृहांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार किनवट प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व ठिकाणी उपरोक्त बाबी पुरवठा करण्याबाबत धोरण ठरविण्यात आले . सन 2019 च्या आक्टोबरमध्ये वसतीगृहांना बंकबेड , डेक्स बेंच . खाण्याचे व मिंटिग टेबल , कपाट इत्यादी साहित्य पुरवठा झाला. डायनिंग टेबलने भोजन कक्ष दिमाखदार झाले. मिटींग टेबलने अभ्यासिका उजळून निघाल्या. अत्याधुनिक बेकबेडने निवासालये तारांकित झालीत. प्रकल्पाधिकारी अभिनव गोयल यांच्या पुढाकारातून शासकीय आश्रम शाळा व वसतीगृहातील विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गाने आनंद व्यक्त केला आहे.
"शासनाच्या धोरणानुसार सर्वेक्षण करून जुन्या मळकट, कळकट बाबी बाजूला सारून विद्यार्थ्यांच्या मनाला प्रसन्न करणाऱ्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अशा आनंदी वातावरणात मुले रमतील अन जोमाने अभ्यास करून आपलं भवितव्य उज्ज्वल करतील.
-अभिनव गोयल (भाप्रसे ), प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, किनवट.
Friday 6 March 2020
Home
तालुका
आधुनिक साहित्य पुरवठ्याने आदिवासी आश्रम शाळां, वसतीगृहांचा प्रकल्पाधिकारी अभिनव गोयल यांनी केला कायापालट
आधुनिक साहित्य पुरवठ्याने आदिवासी आश्रम शाळां, वसतीगृहांचा प्रकल्पाधिकारी अभिनव गोयल यांनी केला कायापालट
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment