मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा पहिला अर्थसंकल्प शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या संकल्पांना अर्थ देणारा – खासदार हेमंत पाटील
औंढा नागनाथ ,माहुर ,नर्सी नामदेव या तीर्थक्षेत्रांसाठी भरीव निधीची तरतूद
------------------------------------------------------------------------------------------------------
किनवट :महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प राज्यातील शेतकरी ,आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देऊन विकासाला दिशा देणारा असल्याची प्रतिक्रिया हिंगोली लोकसभा क्षेत्राचे खासदार हेमंत पाटील यांनी दिली .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चा पहिला अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा देणारा आहे. राज्यातील शेतकरी हिताच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णयामुळे शेतकरी नक्कीच सुखावणार आहे , मराठवड्यातील तीर्थक्षेत्रासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे यामध्ये हिंगोली लोकसभा मतदार संघातील औंढा नागनाथ,माहुर रेणुका देवी आणि नर्सी नामदेव यांचा समावेश आहे . नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहनपर निधी, पीक विमा योजनेत सुधारणा करण्यासाठी मंत्री स्तरावर समिती स्थापन करणे तसेच शेतकरी हेलपाटे न मारता दिलेली कर्जमाफी आणि त्याकरिता 22 हजार कोटींचा निधी मंजूर करून दिला आहे .तर 2 लाखा पेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देऊन राज्याच्या तिजोरीतून मदत करण्यात आली असल्याने जगाचा पोशिंदा आता यापुढे आत्महत्या करणार नाही असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले, बंद शेतीपंपासाठी पुन्हा वीज जोडणी सुरू करणे, पाच वर्षात ५ लाख सौरपंप, ठिबक सिंचन योजनेसाठी प्रोत्साहन या बाबी शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या ठरणार आहेत,तर राज्यातील ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना देण्यासाठी कायदा करण्याची घोषणा, बेरोजगार युवकांना दिलासादायक आहे .रोज १ लाख शिवभोजन थाळी देण्याचा सरकारचा मानस असून शिवभोजन थाळी केंद्रावर ५०० थाळी देऊन शिवभोजन थाळीसाठी १५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे .शहरी आणि ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी केलेल्या महत्वपूर्ण घोषणा,आणि आमदार निधीत ५० टक्क्यांची वाढ करून तो २ कोटींवरून ३ कोटी करण्याचा निर्णय, राज्य परिवहन मंडळासाठी १ हजार ६०० नवीन बसेस व मिनीबस खरेदी करण्याची योजना, महिला बचत गटांकडून १ हजार कोटी रूपयांची खरेदी, आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात दिशा कायदा करण्यासंदर्भातील घोषणा सर्वच बाबी महाराष्ट्र राज्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या आहेत ,असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले ,राज्यातील न्याय व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि महिलांवरील वाढत्या अत्याचारांचे खटले जलदगतीने सोडविण्यासाठी १३८ जलदगती न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी एक महिला पोलीस ठाणे स्थापन करण्याचा राज्यसरकाराचा मनोदय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा वाटतो .असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले .
Friday, 6 March 2020

Home
जिल्हा
मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा पहिला अर्थसंकल्प शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या संकल्पांना अर्थ देणारा – खासदार हेमंत पाटील
मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा पहिला अर्थसंकल्प शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या संकल्पांना अर्थ देणारा – खासदार हेमंत पाटील
Tags
# जिल्हा
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment