कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे देशभर जाहीर कार्यक्रम,समारंभावर निर्बंध - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 7 March 2020

कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे देशभर जाहीर कार्यक्रम,समारंभावर निर्बंध

कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे देशभर जाहीर कार्यक्रम,समारंभावर निर्बंध

नवी दिल्लीः कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे खबरदारीचे उपाय म्हणून जाहीर कार्यक्रम, समारंभ घेऊ नयेत, अशा सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत. त्यामुळे रविवारच्या जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केले गेलेले अनेक जाहीर कार्यक्रम रद्द करावे लागणार आहेत.

जगातील ७९ हून अधिक देशांत कोरोना विषाणुचा फैलाव झाला आहे. राजधानी दिल्लीमध्येही कोरोनाचा रूग्ण आढळल्यामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. भारतात २९,६०७ लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जाहीर कार्यक्रम, समारंभावर केंद्र सरकारने निर्बंध आणले आहेत. तसे स्पष्ट निर्देश सर्व राज्यांना देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्देशामुळे जागतिक महिला दिनी आयोजित कार्यक्रम, केंद्राच्या या निर्देशाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगानेही देशभरातील विद्यापीठांना असेच निर्देश जारी केले आहेत.

No comments:

Post a Comment

Pages