वन तस्करांकडून १५ हजार रुपयांचे सागवान कटसाईज माल जप्त - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 7 March 2020

वन तस्करांकडून १५ हजार रुपयांचे सागवान कटसाईज माल जप्त

वन तस्करांकडून १५ हजार रुपयांचे सागवान कटसाईज माल जप्त




किनवट : किनवट वनपरिक्षेत्रा अंतर्गत कोठारी(कि.ता.किनवट) शिवारात वनविभागाच्या पथकाने गुप्त माहिती च्या आधारे संशयित ओटोचा पाटलाग केला असता वन तस्करांनी अंधाराचा फायदा घेऊन अॅटोतील अवैध सागवानाचा कट साईज माल टाकून पळ काढला.सदरील कारवाई शुक्रवारी (दि.६) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. यावेळी वनविभागाने कट साईज सागवानाचे एकूण ५५ नग, घ .मी . ०.१५१७ मालाची अंदाजे किंमत पंधरा हजार रुपये जप्त करण्यात वन पथकाला यश मिळाले. .
      अज्ञात तस्करा विरुद्ध वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे . सदरील कार्यवाही सहाय्यक वनसंरक्षक व्ही. .जी.गायकवाड , वनपरिक्षेञ अधिकारी के .एन.खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल के.जी. गायकवाड , सोनकांबळे , सांगळे, मंजाळकर , वनरक्षक संभाजी घोरबांड,  सारगे ,रवी दांडेगावकर, वाहन चालक बी. व्ही आवळे, बी. टी.भुतनर, वनमजूर भावसिंग, सातव, गरड,फारुख यांचा समावेश असलेल्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment

Pages