पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली असती तर वाचला असता भीमराज! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 17 March 2020

पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली असती तर वाचला असता भीमराज!

पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली असती तर वाचला असता भीमराज!
वैजापूर :आपल्या मुलीला पळवून नेल्याच्या संशयातून लाख खंडाळा येथील देविदास छगन देवकर, रोहिदास छगन देवकर या भावांनी एका दलित कुटुंबावर शनिवारी रात्री केलेल्या हल्ल्यात एका निरपराध युवकाचा जीव गेला. भीमराज बाळासाहेब गायकवाड (१७) या युवकाचे झाेपेतच मुंडके छाटून सूड उगवण्यात आला. या हल्ल्यात भीमराजचे वडील बाळासाहेब आणि आई अलकाबाई या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मृत युवकाच्या वडिलांनी १३ मार्च रोजी वैजापूर पोलिसांसह जिल्हा पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन आपल्या जिवाला धोका असल्याचे कळवले होते. मात्र, पोलिसांनी या तक्रारीची दखलच घेतली नसल्याने एका निरपराधाचा बळी गेला.बाळासाहेब गायकवाड यांनी पोलिस अधिकारी गोपाळ रांजणकर यांची शुक्रवारी सकाळी ११ वाजता भेट घेऊन तक्रार दिली होती. तक्रारीत त्यांचा मुलगा १२ मार्च रोजी दुपारी घरातून कामाला जातो असे सांगून गेला. रात्री परतलाच नाही. त्याच रात्री सागर देवकर याने आमच्या घरी येऊन तुमचा मुलगा कुठे आहे असे विचारून सकाळपर्यंत माझी बहीण व तुमच्या मुलाला घेऊन या नाही तर तुमच्या संपूर्ण कुंटुबाला मारुन टाकू, असे धमकावले. सदरील कुटुंब सधन असून ते काहीही करू शकतात. त्यांच्यापासून आमच्या कुटुंबास धोका निर्माण झाल्याचे म्हटले होते.

No comments:

Post a Comment

Pages