आज मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात लाॅकडाऊन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्लीः मागील दोन दिवसांत देशाच्या अनेक भागांत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. राज्य सरकारांच्या या प्रयत्नांना अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आज मध्यरात्रीपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात येत आहे. भारताला वाचवण्यासाठी, भारतातील प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी घराच्या बाहेर निघण्यास पूर्णतः बंदी घालण्यात येत आहे. देशातील प्रत्येक राज्य, प्रत्येक केंद्र शासित प्रदेश, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक गाव, प्रत्येक खेड्यात, गल्ली-मोहल्ल्यात लॉकडाऊन करण्यात येत आहे, अशी घोषणा मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशात केली.
Tuesday, 24 March 2020
*ताजी बातमी : आज मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात लाॅकडाऊन - पंतप्रधान नरेंद्र मोदी*
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment