कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नंदिग्रामसह २३ रेल्वे रद्द - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 17 March 2020

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नंदिग्रामसह २३ रेल्वे रद्द

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नंदिग्रामसह २३ रेल्वे रद्दमुंबईः कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता रेल्वेनेही कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली असून नंदीग्राम, डेक्कन, राजधानी, दुरोंतोसह २३ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळणे आणि गर्दी कमी करणे हा या निर्णयामागचा हेतू असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
    कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे देशात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणुचा संसर्ग आणि रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी झाल्यामुळे या रेल्वे ३१ मार्चपर्यंत रद्द करण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

रद्द करण्यात आलेल्या रेल्वे अशाः

11401-मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस 23 मार्च ते 1 एप्रिल.

11402-नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस 22 ते 31 मार्च.

11007-मुंबई- पुणे डेक्कन एक्स्प्रेस 19 ते 31 मार्च.

11008-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस 18 ते 31 मार्च.

11201-एलटीटी-अजनी एक्स्प्रेस 23 ते 30 मार्च.

11202-अजनी-एलटीटी एक्स्प्रेस 20 ते 27 मार्च.

11205-एलटीटी-निझामाबाद एक्स्प्रेस 21 ते 28 मार्च.

11206-निझामाबाद-एलटीटी एक्स्प्रेस 22 ते 29 मार्च.

22135/22136-नागपूर-रेवा एक्स्प्रेस 25 मार्च.

11417-पुणे-नागपूर एक्स्प्रेस 26 मार्च ते 2 एप्रिल

11418-नागपूर-पुणे एक्स्प्रेस 20 ते 27 मार्च.

22139-पुणे-अजनी एक्स्प्रेस 21 ते 28 मार्च.

22140-अजनी-पुणे एक्स्प्रेस 22 ते 29 मार्च.

12117/12118-एलटीटी-मनमाड एक्स्प्रेस 18 ते 31 मार्च.

12125-मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस 18 ते 31 मार्च.

12126-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस 19 मार्च ते 1 एप्रिल.

22111-भुसावळ-नागपूर एक्स्प्रेस 18 ते 31 मार्च.

22112-नागपूर-भुसावळ एक्स्प्रेस 19 ते 30 मार्च.

11307 /11308-कलबुर्गी सिकंदराबाद एक्स्प्रेस 18 ते 31 मार्च.

12262-हावडा-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस 24 ते 31 मार्च.

12261-मुंबई-हावडा दुरांतो एक्स्प्रेस 25 मार्च ते 1 एप्रिल.

22221-सीएसएमटी-निझामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस 20, 23, 27 आणि 30 मार्च.

22222-निझामुद्दीन सीएसएमटी राजधानी एक्स्प्रेस 21, 24, 26 आणि 31 मार्च.

No comments:

Post a Comment

Pages