वैजापूर तालुक्यातील दलित हत्या व अत्याचार प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 18 March 2020

वैजापूर तालुक्यातील दलित हत्या व अत्याचार प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा

वैजापूर तालुक्यातील दलित हत्या व अत्याचार प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा


औरंगाबाद :  वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावातील गायकवाड या दलित कुटुंबावर निर्घृण हल्ला करण्यात आला. यात भीमराज गायकवाड या अल्पवयीन तरुणाचे घटनास्थळीच निधन झाले, तर त्याचे आई, वडील गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहेत.
    गायकवाड कुटुंबातील मोठा मुलगा आणि हल्लेखोरांच्या कुटुंबातील मुलगी यांचे एकमेकांवर प्रेम होते आणि ते सोबत पळून गेले आहेत आणि म्हणून आमचे नाक कापल्या गेले, अशी या हल्लेखोरांची या मागे मानसिकता आहे. हा हल्ला म्हणजे जातीय ऑनर किलिंग आहे. मृत भीमराव गायकवाड व जखमी असलेले त्याचे आई आणि वडील या तिघांचेही नाकं धारधार शस्त्राने कापण्यात आले आहेत, या कृत्यावरून हल्लेखोरांची जातीय मानसिकता लक्षात येते. हल्लेखोर हे फार उच्चवर्णीय जातीतले नसून एका ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या जातीतील आहेत.

   या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या जातीय अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात पुढील कार्यक्रम ठेवण्यासाठी  औरंगाबादच्या सुभेदारी गेस्ट हाऊसच्या हिरवळीवर आंबेडकरवादी कृती समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीस शहरातील दिग्गज दलित नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. या घटनेच्या विरुद्ध दि.२७ मार्च रोजी औरंगाबाद शहरातील क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्याचे ठरले. तसेच या प्रकरणाच्या न्यायालयीन कामकाजावर या परिवाराला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने वचक ठेवण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते श्रावनदादा गायकवाड यांच्या नेतृत्वात समिती गठीत करण्याचेही ठरले आहे.

No comments:

Post a Comment

Pages