प्रादेशिक जिल्हा स्तरीय अॅबेकस स्पर्धा २०२० ; कु.सृष्टी रूपेश मुनेश्वर प्रथम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 18 March 2020

प्रादेशिक जिल्हा स्तरीय अॅबेकस स्पर्धा २०२० ; कु.सृष्टी रूपेश मुनेश्वर प्रथम

प्रादेशिक जिल्हा स्तरीय अॅबेकस स्पर्धा २०२० ; कु.सृष्टी रूपेश मुनेश्वर प्रथम

यवतमाळ :- मेगा माईंड टीम महाराष्ट्र व्दारे आयोजित  प्रादेशिक जिल्हा स्तरीय अॅबेकस स्पर्धा २०२०.
दि.०१.०३.२०२० रोजी आयोजित करण्यात आली होती. 
   अमरावती विभागात यवतमाळ येथे तीन ठिकाणी ह्या स्पर्धेचे केंद्र देण्यात आले होते. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला होता. 
स्पर्धेत एकुण ५ लेवल, वयोगटानुसार ठरवले जातात. १ st लेवल ० ते ७ वयोगटात कु.सृष्टी हिने ४ मिनिटाचा वेळ असणारा पेपर अवघ्या २ मिनिटे १० सेकंदात सोडवून प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशात तिच्या अॅबेकसच्या प्रशिक्षका प्रणाली देशमुख व आई- वडिलांनी महत्त्वाची भूमिका आहे.
   या यशाबद्दल स्कूल ऑफ जिनियस,यवतमाळ चे सर्व शिक्षक तसेच एड.मिलिंद सर्पे, विजय कावळे, दशरश पवार, पुंडलिक मुनेश्वर, रमेश मुनेश्वर , दिलीप भगत,  राजेश मुनेश्वर,सुरेश मुनेश्वर,प्रा.सुबोध थोरात, प्रा.रत्नदीप,गंगाळे, प्रा.सुबोध सर्पे एड.सम्राट सर्पे, मिडलपथ न्यूज नेटवर्क संपादक सम्यक सर्पे आदींनी कौतुक केलं आहे.

No comments:

Post a Comment

Pages