आंबेडकरी चळवळीतील सच्च्या अनुयायास आपण मुकलो-सदानंद फुलझेले यांच्या निधनाने मुख्यमंत्र्यांना शोक - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 15 March 2020

आंबेडकरी चळवळीतील सच्च्या अनुयायास आपण मुकलो-सदानंद फुलझेले यांच्या निधनाने मुख्यमंत्र्यांना शोक

आंबेडकरी चळवळीतील सच्च्या अनुयायास आपण मुकलो-सदानंद फुलझेले यांच्या निधनाने मुख्यमंत्र्यांना शोक

मुंबई, दि. १५: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांच्या निधनाने दीक्षाभूमीसाठी आपले आयुष्य समर्पित केलेल्या आंबेडकरी  चळवळीतील एका सच्च्या अनुयायास आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

बाबासाहेबांच्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी सांभाळलेले सदानंद फुलझेले हे त्या काळातल्या सगळ्या क्षणांचे साक्षीदार तर होतेच पण त्यांनी बाबासाहेबांसारख्या महान व्यक्तिमत्वाला साथ दिली, त्यांच्यासमवेत उभे राहिले. आयुष्याच्या शेवटपर्यंत फुलझेले यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कामात स्वत:ला झोकून दिले आणि आपल्या कार्याचा ठसा उमटविला, असे मुख्यमंत्री म्हणतात.

आज दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेबांचे चिरंतन भव्य स्मारक उभे आहे, त्यामागे दादासाहेब गायकवाड, दादासाहेब गवई यांचेसोबत सदानंद फुलझेले यांचे नाव आवर्जून घेतलेच पाहिजे. समाजातील गोर गरीब विद्यार्थ्यांनी भरपूर शिकावे म्हणून त्यांनी केलेले भरीव कार्य निश्चितच स्मरणात राहील. सदानंद फुलझेले यांच्या रूपाने आंबेडकरी चळवळीतला एक मोठा दुवा आता आपल्यातून गेला आहे, मात्र त्यांच्या कार्याचे विस्मरण होऊ न देणे हीच खरी श्रद्धांजली राहील, असेही मुख्यमंत्री म्हणतात.

No comments:

Post a Comment

Pages