15 मार्च रोजी घेण्यात येणारी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा पुढे ढकलण्यात यावी -स्वप्नील इंगळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 13 March 2020

15 मार्च रोजी घेण्यात येणारी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा पुढे ढकलण्यात यावी -स्वप्नील इंगळे

१५ मार्च रोजी घेण्यात येणारी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी- स्वप्नील इंगळे





 औरंगाबाद : कोरोना या जीवघेण्या विषाणू चा संसर्ग टाळण्यासाठी  सहाय्यक  मोटार वाहन पदासाठी घेण्यात येणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेस चे स्वप्नील इंगळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक निवेदन शासनास नुकतेच देण्यात आले आहे .
   या परीक्षेसाठी सम्पूर्ण महाराष्ट्रातून एकूण २४० पदासाठी ९६ हजार एवढे विदयार्थी परिक्षेसाठी आवेदन (अर्ज) सादर केले आहेत.सदरील परिक्षा  ही पुणे ,औरंगाबाद ,मुंबई ,नाशिक ,अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये विविध केंद्रावर होणार आहेत.
     सदरील निवेदनावर दिग्विजय नरंगले(नांदेड) ,संदीप माने(पुणे),राजेश राठोड(औरंगाबाद),भारत व्यवहारे(पंढरपूर) ,सईद शेख(कोल्हापूर ),कांचन आवारे(नाशिक),धराजी वाघमारे(परभणी ),परमेश्वर कलवले(लातूर),महेश कळसकर(औरंगाबाद)  याची नावे आहेत.
    भविष्यातील धोका टाळून
परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी आरोग्यमंत्री तसेच विविध खात्याच्या मंत्र्यांकडे पाठवलेल्या निवेदनात नमुद केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages