येत्या बुधवारी किनवट मध्ये सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 13 March 2020

येत्या बुधवारी किनवट मध्ये सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत

येत्या बुधवारी किनवटमध्ये सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत

किनवट : किनवट तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी ( दि. 18) सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालयातील सभागृहात होणार असून सबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
                ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सन 2020 ते 2025 या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका लक्षात घेऊन बिगर अनुसूचीत क्षेत्रात येणाऱ्या व पुर्णतः अनुसुचीत क्षेत्रात येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीच्या एकाच वेळी तसेच मुंबई ग्रामपंचायत अधिनीयम 1958 च्या कलम 30 मधील तरतुदी नुसार पुर्णतः अनुसुचीत क्षेत्रात येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाची पदे अनुसुचित जमाती करीता कायम आरक्षीत ठेवायची असून त्यापैकी एक व्दितीयांश पदे त्यांच्यातील महिलांकरिता निश्चीत करावयाची आहेत . त्या अनुषंगाने ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सन 2020 ते 2025 या कालावधी करिता सोडत पध्दतीने आरक्षण काढण्यात येणार असुन बुधवारी ( दि. 18)   सकाळी ठिक 11 . 00 वाजता तहसील कार्यालय, किनवट येथील सभागृहात सबंधितांनी उपस्थीत राहावे,असे आवाहन प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार नरेंद्र देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages