जनता संचारबंदी ला शहर व परिसरात उत्स्फुर्त प्रतिसाद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 22 March 2020

जनता संचारबंदी ला शहर व परिसरात उत्स्फुर्त प्रतिसाद

जनता संचारबंदी ला शहर व परिसरात उत्स्फुर्त प्रतिसाद
किनवट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी (दि.२२) शहर व परिसरात "जनता संचारबंदी" ला स्वयंस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

   आज आठवडी बाजाराचा दिवस असूनही प्रशासनाच्या आवाहना नुसार बाजार कडकडीत बंद ठेवण्यात आला होता.एस.टी. बसचे चाके थांबली होती.बसस्थानकावर शुकशुकाट दिसत होता.रेल्वे बंद असल्याने रेल्वे स्थानकावर ही माणसे दिसत नव्हती. रस्ते निर्मणुष्य दिसत होते.शहरातील शिवाजी चौक, जिजामाता चौक,अशोक स्तंभ, पंचायत समिती चौक,डाॅ.आंबेडकर चौकात शुकशुकाट पसरला होता.
 
तालुका प्रशासनाने जनता संचारबंदी यशस्वी व्हावी यासाठी पुढाकार घेतला होता.यात सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, तहसीलदार नरेंद्र देशमुख,गट विकास अधिकारी सुभाष धनवे,नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश शेट्टी सुंकेवार, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.संजय मुरमुरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.उत्तम धुमाळे, मराठवाडा विकास मंडळाच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक बेलखोडे, किनवट डाॅक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डाॅ.शिरीष पत्की, पोलिस निरीक्षक मारोती थोरात, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रफुल्ल बागल यांच्यासह तालुका प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला होता.त्याला लोकप्रतिनिधी, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दर्शविला होतो.संचारबंदिच्या काळात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 शहर स्वच्छतेसाठी नगर परिषदेचे कर्मचारी सकाळपासूनच कार्यरत असल्याचे दिसून आले.पेपर वाटप करणा-यांनी सकाळीच वृतमानपत्राचे वाटप करुन सकाळच्या चहाची लज्जत वाढवली होती.

संध्याकाळी 5 वा. नागरिकांनी अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देणाऱ्यां कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ नागरिकांनी टाळ्या व थाळी वाजवून आभार व्यक्त केले.

1 comment:

  1. हार्दिक शुभकामनाएं
    बी.संदेश
    हैदराबाद, तेलंगाना

    ReplyDelete

Pages