१४ एप्रिलला वझरा(बु.)येथे रक्तदान शिबीर आयोजित करुन डाॅ.आंबेडकरांना अर्पण करणार आदरांजली.
किनवट: बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येत्या १४ एप्रिल रोजी वझरा(बु.ता.किनवट)येथे सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ "रक्तदान शिबिर" आयोजित करण्यात आले आहे.
जात-पात, धर्मभेद, विचारभेद वा पक्षभेद त्यागून "मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय" ही भावना मनाशी बाळगून ह्या रक्तदान शिबिरात आपला मौलीक सहभाग नोंदवावा आणि महामानवाला जयंतीनिमित्त एक आगळीवेगळी मानवंदना द्यावी,असे आवाहन भीमजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोनासारखा संसर्गजन्य आजार पसरू नये याची पूर्ण व्यवस्था, दक्षता घेतली जाईल.या साठी Social Distancing, Face Mask, Sanitizer, Hand Wash प्रतिबंधनात्मक पूरक साहित्यांची व्यवस्था केली जाईल,असे समीतीतर्फे सांगण्यात आले.
Tuesday 7 April 2020
Home
तालुका
१४ एप्रिलला वझरा(बु.)येथे रक्तदान शिबीर आयोजित करुन डाॅ.आंबेडकरांना अर्पण करणार आदरांजली.
१४ एप्रिलला वझरा(बु.)येथे रक्तदान शिबीर आयोजित करुन डाॅ.आंबेडकरांना अर्पण करणार आदरांजली.
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment