आपत्तीच्या काळात "माकप" ची नांदेड जिल्हा कमिटी पिडीत आणि गरजूंना सर्वतोपरी मदत करण्यास कटिबध्द आहे.
नांदेड : जागतिक आणि राष्ट्रीय आपत्ती च्या काळात कोविड - १९ चा संसर्गजन्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच यंत्रणा प्रयत्नशील आहेत.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, नांदेड जिल्हा कमिटी देखील पिडीत व गरजूंना सर्वतोपरी मदत करीत आहे. लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात काही ठिकाणी मदत केलेला तपशील सादर करीत आहोत.दि.२६ मार्च रोजी दोन घटना आमच्या निदर्शनास आल्या त्या म्हणजे कॉ.किसन गुजर राज्य अध्यक्ष अ.भा.किसान सभा यांनी फोनवरून कॉ.विजय गाभणे पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य यांना कळविले की, राजस्थान जिल्हा सिक्कर येथील काही कामगार अर्धापूर तहसिल हद्दी मध्ये अडकून पडले आहेत तेव्हा तात्काळ पक्षाचे नांदेड शहर सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांचे सह शोध घेऊन राजस्थान येथील कामगारांची भेट रात्री उशिरा घेतली. तत्पूर्वी तहसीलदार अर्धापूर आणि पोलीस निरीक्षक, अर्धापूर यांना सर्व माहिती देऊन संरक्षण,राहणे आणि खाण्याची व्यवस्था करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी नांदेड, पोलीस अधिक्षक, नांदेड व सर्वच शासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. राजस्थान मधील एकूण 82 कामगारांना मदत करून पुढील प्रवास सुखकर करून दिला. त्या वेळा राजस्थान येथील सीकर, नागोर आणि बिकानेर या जिल्ह्यातील कामगार लॉक डाऊन मध्ये अडकले होते त्या सर्वांना योग्य मदत करण्यात आली. दुसऱ्या घटनेत डी.वाय.एफ.आय.च्या महाराष्ट्र राज्य सचिव कॉ.प्रिती शेखर यांनी फोनवरून एस.एफ.आय. राज्यअध्यक्ष कॉ.बालाजी कलेटवाड यांना हिंगोली जिल्ह्यामध्ये केरळ येथील अडकलेल्या कुटुंबाची माहिती दिली. तेव्हा तात्काळ २७ मार्च रोजी बालाजी कलेटवाड व अविनाश घाडगे यांनी मोटार सायकलवर जाऊन त्या अडकलेल्या दाम्पत्याची हिंगोली येथे भेट घेऊन औषधी पुरविण्याचे काम केले.
पक्षाचे नेते एस.के.रेगे यांनी फोन करून तामिळनाडू येथील कामगार यवतमाळ जिल्ह्यात अडचणीत आडकले आहेत त्यांना मदत करण्याची सूचना पक्षाचे जिल्हा कमिटी सभासद कॉ.किशोर पवार यांना दिली.त्यांनी संबंधित लोकांना फोनवर बोलून चौकशी करून जेवणाची व्यवस्था केली. पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉ.शंकर सिडाम व जिल्हा कमिटी सदस्य कॉ.प्रल्हाद चव्हाण यांनी माहूर तालुक्यातील अपंग,वयोवृध्द,विधवा,भूमिहीन तसेच निराधार पीडित लोकांना तात्काळ सानूग्रह अनुदान वाटप करण्याची मागणी निवेदना मार्फत केली आहे.पाठपुरावा पक्षाच्या शहर कमिटीने केला आणि मागण्या मान्य करण्याची सूचना अप्पर जिल्हाधिकारी नांदेड यांनी तहसीलदार, माहूर यांना दिली. पक्षाच्या वतीने योग्य पाठपुरावा सुरूच राहिल.
आदिवासींच्या बळकावलेल्या जमीनी परत आदिवासींना देण्यात याव्यात ही मागणी घेऊन दि.९ एप्रिल रोजी माहूर तालुक्यातील सारखणी फाटा येथे आदिवासी अधिकार मंच च्या वतीने चक्का जाम आंदोलनाची हाक कॉ.शंकर सिडाम यांनी दिली होती. परंतु, बेमुद्दत संचार बंदी मुळे नियोजित आंदोलन पुढे ढकलण्यात आले. तसेच हैद्राबाद,तेलंगणा व तामिलनाडू मध्ये अडकलेल्या शेकडो कामगारांची जेवणाची व आरोग्याची व्यवस्था करावी अशी सूचना संबंधित ठेकेदारांना फोनवर बोलून करण्यात आली. तालुक्यात एस.एफ.आय. आणि डी.वाय.एफ.आय. च्या संयुक्त प्रयत्नातुन मदत निवारण मोहिम राबविण्यात येत आहे.ती जबाबदारी प्रफुल कऊडकर आणि कॉ.अमोल आडे योग्यरित्या पार पाडत आहेत.
पक्षाचे जिल्हा कमिटी सभासद कॉ.विनोद गोविंदवार व तेथील तालुका कमिटीच्या वतीने मुखेड शहरातील बजरंग नगर येथील भटक्या विमुक्त जातीच्या ६९ कुटुंबातील लोकांना रेशन कार्डचे आर.सी.आय.डी.नंबर तयार करून दिले ज्या मुळे वर्षानुवर्षे रेशन पासून वंचित असणाऱ्या कुटुंबियांना लाभ मिळणार आहे. तहसीलदारांना भेटून तालुक्यातील व शहरातील सरसगट लोकांना अन्न धान्य पुरविण्याची मागणी करण्यात आली.नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांना भेटू तात्काळ नळजोडणीचे काम पुर्णत्वास नेण्यात येत आहे.शहरातील मार्केट कमिटीच्या मैदानात पाल टाकून रहात असलेल्या बेघर भटक्या कुटुंबातील लोकांची नावे नगर परिषदेत नोंद करून २४ ते २५ कुटुंबियांना रेशनची व्यवस्था करून देण्यात आली.
अंबुलगा ग्राम पंचायत च्या ठिकाणी इतर ठिकणाहून स्थलांतरीत लोकांना स्थानबध्द करून त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे.गावातील ग्रा.पं. सदस्य व पक्ष सभासदांच्या वतीने योग्य खबरदारी घेत गरजूंना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
किनवट येथील पक्षाच्या तालुका कमिटीच्या वतीने बाहेर गावातील अडकलेल्या गरजूंना मदत केली जात आहे.एस.एफ.आय. व डी.वाय.एफ.आय. च्या वतीने मदत मोहीम राबविली जात आहे.
नांदेड शहरामध्ये आंध्र,तेलंगणा व तामिलनाडू येथील कामगार अडकले होते त्यांना पक्षाच
Tuesday 7 April 2020
Home
जिल्हा
आपत्तीच्या काळात "माकप" ची नांदेड जिल्हा कमिटी पिडीत आणि गरजूंना सर्वतोपरी मदत करण्यास कटिबध्द आहे.
आपत्तीच्या काळात "माकप" ची नांदेड जिल्हा कमिटी पिडीत आणि गरजूंना सर्वतोपरी मदत करण्यास कटिबध्द आहे.
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment