ईस्लापुर नंतर आता मुरझळा व कोल्हारी मध्ये आशिष सेवाभावी संस्थे द्वारा गरजुंना अन्नधान्य व राशन वाटप तिस-या व चौथ्या दिवशी देखील सतत चालुच - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 7 April 2020

ईस्लापुर नंतर आता मुरझळा व कोल्हारी मध्ये आशिष सेवाभावी संस्थे द्वारा गरजुंना अन्नधान्य व राशन वाटप तिस-या व चौथ्या दिवशी देखील सतत चालुच

ईस्लापुर नंतर आता मुरझळा व कोल्हारी मध्ये आशिष सेवाभावी संस्थे द्वारा गरजुंना अन्नधान्य व राशन वाटप तिस-या व चौथ्या दिवशी देखील सतत चालुच



 किनवट : राजुदादा शेळके यांच्या आशिष सेवाभावी संस्था, किनवट द्वारा गेल्या चार दिवसापासुन मजुर, गरीब व गरजुंना अन्नधान्याचे वाटप चालु आहे.
   १  एप्रिल पासून आशिष सेवाभावी संस्था या उपक्रमासाठी पुढाकार घेत आहे.प्रथम किनवट मध्ये काहि नगरा मध्ये ४० कुटुबांना अन्नधान्याचे वाटप  करण्यात आले व नंतर राजुदादा शेळके व त्यांची सर्व टिम ईस्लापूर सर्कल मध्ये ७० कुंटुबांना अन्नधान्य वाटप केले. दिनांक ३ व ४ एप्रिल या दोन दिवसात राजुदादा शेळके व त्यांची टिम यांनी मुरझळा व कोल्हारी या गांवात एकुन ३४ गरजु कुटुबांना प्रत्येकी ५ किलो गहु, ५ किलो तांदुळ, १ किलो तेल पाँकेट व १ मिठाचा पुडा वाटप करण्यात आले, यावेळी किनवट मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मारोती शेळके, भारीप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष राजुदादा शेळके, राजु ढोले, शेखर जाधव, रोहिदास शेळके, बंडु गडपाळे व कोल्हारी येथील सामाजिक कार्यकर्ते नागोराव शेळके, सुभाष शेरे, मनोहर सोनकांबळे , बाळासाहेब शेरे इत्यादी हजर होते.
 राजुदादा शेळके यांनी सांगितले की, हा उपक्रम लाँकडाऊन असेपर्यंत आशिष सेवाभावी संस्थे तर्फे सतत चालु राहील.

No comments:

Post a Comment

Pages