कोरोना विषाणूजन्यसाथरोगाचे आव्हान परतवण्यासाठी सामाजिक संघटनेचे योगदान महत्वाचे -आ. उदयसिंग राजपूत यांचे प्रतिपादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 7 April 2020

कोरोना विषाणूजन्यसाथरोगाचे आव्हान परतवण्यासाठी सामाजिक संघटनेचे योगदान महत्वाचे -आ. उदयसिंग राजपूत यांचे प्रतिपादन

"कोरोनो विषाणूजन्य साथरोगाचे आव्हान परतवण्यासाठी सामाजिक संघटनांचे योगदान महत्त्वाचे"
  -आमदार उदयसिंग राजपूत यांचे प्रतिपादन
  मिलिंद पाटील यांच्या संस्थेने केला मास्क, हँडग्लोज,सँनिटायझरचा पुरवठा



कन्नड :  कोरोनो या विषाणूजन्य साथरोगाने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. शासन,प्रशासन सर्व शक्तिने हे आव्हान पेलण्यासाठी कार्य करत आहे. सामाजिक संस्था व संघटनांची साथही तेवढीच महत्त्वाची आहे,असे प्रतिपादन आमदार उदयसिंग राजपूत यांनी तहसील कार्यालयात जिवनावश्यक व प्रतिबंधक साधनांच्या वितरण कार्यक्रमात केले.
    कोरोनो साथरोगाच्या नियंत्रणासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फोनवर आमदार राजपूत यांच्याशी चर्चा करून आढावा घेतला. त्यानंतर आमदार राजपूत यांनी कोरोनो साथरोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्या समोरील  समस्या जाणून घेतल्या.
 या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क,हँडग्लोज, सँनिटायझर या साधनांची गरजही स्पष्ट झाली. श्री.छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नँशनल कमिटी, दिल्लीचेअध्यक्ष माजी मंत्री विजय नवल पाटील तसेच या संस्थेचे उपाध्यक्ष व लक्ष्मी निर्मल प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद लक्ष्मीकांत पाटील यांच्याशी आमदार श्री. राजपूत यांनी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ बाराशे कर्मचाऱ्यांना मास्क, हँडग्लोज, सँनिटायझर हे साहित्य उपलब्ध करून दिले. या साहित्याचे वितरण तहसील कार्यालयात करण्यात आले.
    यावेळी आशा कर्मचारी, नगरपालिका स्वच्छता कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, तलाठी, स्वस्त धान्य वितरक,यांना हे साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी आमदार राजपूत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोरोनो संकट ही राष्ट्रीय आपत्ती व मानवापुढील आव्हान आहे. राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली परिस्थिती नियंत्रणात आहे. सामाजिक संस्था, संघटना आणि बांधिलकी असलेल्या दात्रुत्वशीलांनी आपले योगदान द्यावे.  पोलीस प्रशासनाने लॉकडाऊन प्रभावीपणे यशस्वी करावे. अडचणीत असलेल्या नागरिकांना महसूल विभागाने दक्ष राहून मदत पोहचवावी.
प्रास्ताविकपर भाषणात तहसीलदार संजय वारकड म्हणाले की, तालुक्यातील प्रत्येक गावात अन्य धान्य व जिवनावश्यक साहित्य वितरीत केले आहे. सामाजिक संस्थांचीही मदत घेण्यात येत आहे.
     याप्रसंगी महावीर जयंतीचे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून व्यापारी महासंघाचे हुकुमचंद पांडे यांनी अग्रसेन बँकेच्या वतीने मुख्यमंत्री  एक लाख एकहजार व  स्वतः च्या वतीने एक लाख आठ हजार रूपये निधी पंतप्रधान सहाय्यता निधीही तहसीलदार वारकड यांच्याकडे सुपुर्द केली. तसेच जीवनावश्यक वस्तूही सोपवल्या.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते,पोलीस अधीक्षक जगदीश सातव, पोलीस निरीक्षक रामेश्वर रेगे, सुनील नेवासे, पिशोर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जगदीश पवार, देवगाव रंगारीचे निरिक्षक संजय अहिरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालक्रुष्ण लांजेवार, कन्नड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण पवार, जैन समाजाचे कार्यकर्ते प्रशांत जालनापूरकर,डॉ. रविराज जाधव,डॉ. सदाशिव पाटील, ऋग्वेद पाटील नागदकर,पिशोर ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. धिरज पाटील, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी नंदा गायकवाड, अतिक शेख,आदिंसह आशा कर्मचारी, तलाठी प्रतिनिधी उपस्थित होते. आभार राजानंद सुरडकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Pages