दक्षिणेकडून उत्तर भारताकडे पायी जाणारा ३३ मजूरांचा जत्था ताब्यात घेऊन गोकुंदा येथे मदत शिबीरात ठेवला ; त्यात लहान मुलांसह सहा महिला व चार मुलं - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 2 April 2020

दक्षिणेकडून उत्तर भारताकडे पायी जाणारा ३३ मजूरांचा जत्था ताब्यात घेऊन गोकुंदा येथे मदत शिबीरात ठेवला ; त्यात लहान मुलांसह सहा महिला व चार मुलं

दक्षिणेकडून उत्तर भारताकडे पायी जाणारा ३३ मजूरांचा जत्था  ताब्यात घेऊन गोकुंदा येथे मदत शिबीरात ठेवला ; त्यात लहान मुलांसह सहा महिला व चार मुलं



 किनवट : दक्षिणेकडून उत्तर भारताकडे तेहत्तीस मजूरांचा जत्था कुटूंब काबिल्यासह शिवरस्त्याने पायी जात असल्याची खबर मिळाताच त्यांना ताब्यात घेऊन शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह, गोकुंदा ( पूर्व ) येथे मदत शिबीरात ठेवण्याचे आदेश सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्याने त्यांना 'होमकारोंटाईन ' केले आहे.


            हैद्राबादजवळील रामोजी फिल्मसिटी परिसरात संगारेड्डी जिल्ह्यात कामानिमित्त आलेले स्थलांतरीत मजूर राहात होते. व्यापैकी काहीजन आईस्क्रिम विकायचे तर काहीजन ठेकेदाराच्या अधिनस्त काम करायचे. कोरोना ( कोव्हीड-१९ ) प्रादुर्भावाने झालेल्या लॉकडाऊनमुळे त्यांचं काम थांबलं. जवळच राशन पाणी संपलं. ठेकेदार वा सरकार कामाला जाऊ देईना, अन् जेऊ देईना. तेथे उपाशी मरण्यापेक्षा ते आपल्या बाड -बिस्तऱ्यासह ते आपल्या लेकरा-बाळासह रविवारी ( दि. २९ ) पायी निघाले. रस्त्याने ग्रावकऱ्यांकडून मिळेल ते खात-पित, मजल- दरमजल करत ते पुढं निघाले. तेलंगाणात त्यांना कुठच अडविलं नाही उलट सोनाळ्याजवळील महामार्गाच्या चार किमी अंतरावर पोलिसांनी त्यांना बोलेरो पिकअपमध्ये बसवून महाराष्ट्राच्या सीमेवर घनपूर नाक्याच्या काही अंतरावर सोडले. मुख्य रस्त्याने न जात डोंगराच्या, शेताच्या आडमार्गाने जा अन्यथा नाक्यावरील पोलिस तुम्हाला ताब्यात घेतील असा सल्लाही त्यांनी दिला.
            ते असेच मुख्य रस्ता सोडून कोठारी ( चि) गावाजवळ आले. सकाळीच ग्रामस्थांनी त्यांना जेवन दिले. त्यानंतर एमआयडीसी, आयटीआय मागील रस्त्याने ते आनंदवाडी परिसरातून दत्तनगरमार्गे नागपूरकडे जाणार होते. पाचव्या दिवशी गुरुवारी ( दि. दोन ) सकाळी ११ वाजता पुरी यांनी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अभिनव गोयल यांना खबर देताच त्यांनी तहसीलदार नरेंद्र देशमुख व पोलिस निरिक्षक मारोती थोरात यांना ' त्या स्थलांतरीत मजूरांना ' ताब्यात घेऊन शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह, गोकुंदा ( पूर्व ) येथे ठेवण्याचे सूचित केले. तिथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गजानन काळे यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्या सर्वांच्या हातावर 'होम कोरोंटाईनचा ' शिक्का मारला. गृहपाल एन.एम. पवार यांच्या ताब्यात त्यांना दिले.
            त्या तेहत्तीस मजूरात मध्य प्रदेशचे एकेवीस, बिहारचे सात, उत्तर प्रदेशचे तीन व राजस्थानच्या दोघांचा समावेश आहे. पुरूष : २३, महिला: ६ व मुलं : ४

No comments:

Post a Comment

Pages