२८३ नवीन रुग्णांची वाढ, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ४,४८३ वर
मुंबईः राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आज सकाळी ११ वाजेपर्यंत २८३ नवीन रुग्णांची भर पडल्यामुळे एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४,४८३ वर पोहोचली आहे. ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या पैकी १८७ रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत.
नव्याने आढळून आलेल्या २८३ रूग्णांमध्ये मुंबईतील १८७, नवी मुंबईतील ९, पनवेलमधील ६, पिंपरी-चिंचवडमधील ९, ठाण्यातील २१, वसई-विरारमधील २२, कल्याण- डोंबिवलीमधील १६, भिवंडीतील १, मीरा- भाईंदरमधील ७, नागपुरातील१, रायगडमधील २, साताऱ्यातील १ आणि सोलापुरातील एका रूग्णाचा समावेश आहे.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची 11:00 (AM) पर्यंतची संख्या 4483 यात भिवंडी 1,कल्याण डोंबिवली 16,मीरा भाईंदर 7,बृहन्मुंबई 187,नागपूर 1,नवी मुंबई 9,पनवेल 6,पिंपरी चिंचवड 9,रायगड 2,सातारा 1,सोलापूर 1,ठाणे 21,वसई विरार 22 अशी 283 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे.
Monday 20 April 2020
२८३ नवीन रुग्णांची वाढ, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ४,४८३ वर
Tags
# महाराष्ट्र
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
महाराष्ट्र
Labels:
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment