प्रासंगिक : आंबेडकरवादी मिशन असा ही मदतीचा हात हजारो परिवारांना अन्नधान्य वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 20 April 2020

प्रासंगिक : आंबेडकरवादी मिशन असा ही मदतीचा हात हजारो परिवारांना अन्नधान्य वाटप


आंबेडकरवादी मिशन
असा ही मदतीचा हात
हजारो परिवारांना अन्नधान्य वाटप


दीपक कदम सरांच्या  च्या आवाहनास प्रचंड प्रतिसाद
लाखों लोकांना मिशन च्या आजी माजी विध्यार्थ्यांनी अन्नधान्य वाटून साजरी केली भीम जयंती
आंबेडकरवादी मिशन हे आंबेडकरवादी अधिकारी घडवण्याचा कारखाना आहे, येथे जय भीम म्हणून समाजाची सेवा करणारा अधिकारी तयार होतो.. आज पर्यंत हजारो अधिकारी निर्माण मिशन ने केले, तहसीलदार पदाचा त्याग करून,  दीपक कदम या वादळाने  हजारो अधिकारी निर्माण केले..
समाजाने उभ केलेले हे मिशन 24 तास सर्वांसाठी खुलं असते रात्रंदिवस विध्यार्थी येथे अभ्यास करतात.. कोरोना च्या महामारीत आंबेडकरवादी मिशन चे प्रमुख दीपक कदम सर यांनी स्वतः पुढाकार घेत आंबेडकरवादी मिशन ला आयसोलेशन वॉर्ड तयार करा, 150 खाटाच वॉर्ड, व्यवस्था इथे होईल म्हणून जाहीर पण केल.. सरकारी अधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी यांनी पाहणी केली.. 18 तास प्रणेते दीपक कदम सर डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने  18 तास  अभ्यासउपक्रम  संपूर्ण भारतात.. ह्या वर्षी कोरोना च्या आरिष्ट मोठे होते म्हणून.  लॉकडाऊन  च्या काळात गोरगरिबांना, गरजूना अन्नधान्य वाटून,  फुले आंबेडकर जयंती साजरी करा असे आवाहन दीपक कदम सर प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी केले.. महाराष्ट्रातील मिशन च्या आजी माजी विध्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात अन्नधान्य वाटून फुले आंबेडकर जयंती साजरी केली.. मुंबई ते नांदेड बुलढाणा ते उस्मानाबाद, परभणी, औरंगाबाद.. जिथे जिथे विध्यार्थी तिथे तिथे अन्नधान्य वाटप करून जयंती साजरी करण्यात आली कमीत कमी एक ते दिड लाख परिवारांना अन्नधान्य वाटप मिशन च्या विध्यार्थानी केले आहे, आंबेडकरवादी मिशन,  नांदेड ने सिडको, हडको, वसरणी, मिशन परिसरातील हाजरो गरजूना अन्नधान्य वाटप आज सुद्धा रात्र दिवस चालू आहे.. आंबेडकरवादी मिशन चे प्रमुख दीपक कदम सर यांच्या कार्यास पंचांग प्रणाम..
 जय भीम

             जयवर्धन भोसीकर

No comments:

Post a Comment

Pages