पाण्याचा अपव्यय टाळून शहर टँकरमुक्त करण्यासाठी नागरीकांनी पुढाकार घ्यावा-श्रीनिवास नेम्मानीवार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 20 April 2020

पाण्याचा अपव्यय टाळून शहर टँकरमुक्त करण्यासाठी नागरीकांनी पुढाकार घ्यावा-श्रीनिवास नेम्मानीवार

पाण्याचा अपव्यय टाळून शहर टँकरमुक्त करण्यासाठी नागरीकांनी पुढाकार घ्यावा-श्रीनिवास नेम्मानीवार





 किनवट : कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भाने उदभवलेल्या परिस्थितीमुळे सर्व नागरीकांनी उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने सुव्यवस्थितरित्या वापर करून नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे आणि आपले शहर या वर्षी टँकरमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्रीनिवास नेम्मानीवार यांनी केले आहे.
   किनवट शहरात मागील 7-8 वर्षापासून तीव्र पाणीटंचाईमुळे टँकरद्वारे गल्लोगल्ली पाणीपुरवठा करण्यात येत होता. यावर्षी पाटबंधारे विभाग, नगर परिषद प्रशासनातील नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक व कर्मचारी यांच्या पुढाकारातून पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधा­-याची दुरूस्ती करून गळती थांबवून गेट बसवून पाणी अडविले आहे. यामुळे पाणी मुबलक उपलब्ध झाले आहे व किनवट शहरातील विंधन विहीरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. यापूर्वी बंधा­-याचे गेट नादुरूस्त असल्याने पाण्याचा एक थेंबही तेथे साचत नव्हता. त्यामुळे दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच शहरात टँकरद्वारे गल्लोगल्ली पाणी पुरवठा केल्या जात होता. पाणी घेण्यासाठी नागरीकांची तारांबळ उडत होती, तसेच नगर परिषदेच्या कर्मचा­यांना टँकरद्वारे पाणी वितरणासाठी प्रचंड कसरत करावी लागत होती. बंधारा अडविल्याने उपलब्ध पाणी साठ्यामुळे यावर्षी एप्रिल पंधरवाडा संपला तरीही शहरात अद्यापही पाणी टंचाई जाणवत नाही.
तसेच आमदार भीमराव केराम हे पाणीप्रश्नावर बारीक लक्ष ठेवून आहेत, वेळेवर उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनास त्यांनी दिल्या आहेत.
पाणीटंचाईमुळे नागरीकांनी उपलब्ध असलेल्या पाण्याचा अपव्यय करु नये. आपलं शहर टँकरमुक्त राहण्यासाठी हे गरजेचे आहे. अन्यथा, कोरोनाचा प्रादूर्भाव हा जगभर तीव्र होतो आहे, या काळात आपण स्वैरपणे पाणी वापरलं तर पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी लागेल, त्यामुळे आपणास घराबाहेर पडावे लागेल, पाणी घेण्यासाठी नागरीकांची प्रचंड गर्दी होवून चढाओढ होईल. यामध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडेल. त्यामुळे नकळत एखाद्या कोरोना बाधीताच्या संपर्कात येऊन शहराचे स्वास्थ्य बिघडेल. यासाठी सर्व नागरीकांनी भविष्यातील अनर्थ टाळण्यासाठी आताच पाणी जपून वापरावे, तसेच प्रत्येक वार्डातील सुजान नागरीकांनी आपल्या क्षेत्रातील नागरीकांना पाण्याचा अपव्यय होऊ न देण्यासाठी प्रवृत्त करावे, असे कळकळीचे आवाहन भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्रीनिवास नेम्मानीवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages