घराघरात 18 तास अभ्यास उपक्रम राबवा गरिबांना अन्नधान्य वाटून जयंती साजरा करा -दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 10 April 2020

घराघरात 18 तास अभ्यास उपक्रम राबवा गरिबांना अन्नधान्य वाटून जयंती साजरा करा -दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन

घराघरात 18 तास अभ्यास उपक्रम राबवा
गरिबांना अन्नधान्य वाटून जयंती साजरा करा
-दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन
 प्रमुख आंबेडकरवादी मिशन
आंबेडकरवादी मिशन तर्फे गेल्या 16 वर्ष्यापासून  राष्ट्रीयस्तरावर 18 तास अभ्यास उपक्रम आयोजित करून  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येते. पण या वर्षी  कोरोनाचे अरिष्ठ पाहता सर्व विध्यार्थी तरुण व भारतीय जनतेने आपल्या घरात राहून या वर्षी सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत  18 तास अभ्यास करून अभ्यासात्मक अभिवादन करावे असे आवाहन दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी केले

घर तिथे 18 तास अभ्यास करून प्रज्ञासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून भारतीय संविधानाचे शिल्पकाराचे अनुयायी असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करावे
या सोबतच आंबेडकरवादी मिशन च्या सर्व आजी माजी  विध्यार्थानी किमान 1 हजार रु किंवा जेवढे शक्य असतील तेवढे अन्नधान्य शेजारी गरजूना वाटप करावे असे आवाहन या प्रसंगी दीपक कदम यांनी केले.
आपल्या परिसरात, शेजारी, गावी  कोणी गरीब मजूर कुटुंब उपाशी राहणार नाही याची काळजी प्रत्यक्ष आंबेडकरवादी तरुण विध्यार्थ्यांनी घ्यावी
घराघरात 18 तास अभ्यास आणि गरिबांना धान्य वाटप हे या वर्षीचे उद्दिष्ट असल्याचे दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Pages