अवैध सागवानी फर्निचर तस्करासह पकडण्यात वन विभागाला यश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 10 April 2020

अवैध सागवानी फर्निचर तस्करासह पकडण्यात वन विभागाला यश

अवैध सागवानी फर्निचर तस्करासह पकडण्यात वन विभागाला यश



किनवट : बोधडी वनविभागाच्या कर्मचा-यांचे पथक आज (दि.१०)
सकाळी गस्तवर होते.यावेळी त्यांना बोधड़ी घाटातून  पिवळ्या रंगाच्या आॅटो रिक्षातून अवैध फर्निचर घेऊन जात असतांना  आढळले,पथकाने पाठलाग करुन आॅटो रिक्षासह तस्करास पकडले. आॅटोसह जवळपास सत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त केला. शिवाय आरोपी शेख वसीम शेख ईसा विरुद्ध वन गुन्ह्याची नोंद केली.अधिक तपास चालु असल्याचे वन विभागाने सांगितले.


          लाकूड तस्करी करणारे तस्कर रंगेहात वनविभागाच्या सापडत नसतात. क्वचितच असे आरोपी हाती लागतात. दि.१० रोजी सकाळी बोधडी वनविभागाचे कर्मचारी गस्तवर निघाले होते. अशातच बोधडी घाटात एका आॅटो रिक्षात सागवान कटसाईज फर्निचर जात असल्याचा संशय त्यांना आला. आॅटोच्या दिशेने कर्मचारी निघाल्यानंतर त्या तस्कराने पळ काढला होता. परंतु कर्मचा-यांनी पाठलाग करुन साठ हजाराचा आॅटोरिक्षा व दहा हजाराचे फर्निचरचे कटसाईज लाकडासह शेख वसीम शेख ईसा यास पकडले. वन गुन्ह्यांतर्गत नोंद करुन पुढील कार्यवाही चालु असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.यु.जाधव यांनी सांगितले. उपवन संरक्षक आशिष ठाकरे व सहाय्यक वनसंरक्षक पवार यांच्या मार्गदर्शनावरुन सदरची कार्यवाही केली. वनरक्षक तोटावाड, नारायण कोरडे, मुंडे, भुरके, गोरख देवकांबळे यांनी ही मोलाची कामगिरी बजावली आहे.

No comments:

Post a Comment

Pages