महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या रक्तदान शिबिरात १०० रक्तदात्यांनी केले रक्तदान
किनवट : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान करण्यात तालुका आता पुढे सरसावला आहे.गुरुवारी(दि.९ )सरस्वती विद्यामंदीर, शाळा व महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद किनवट व माहूर तालुका शाखेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केले. श्री गोळवलकर गुरुजी रक्तपेढी नांदेड यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिराचे उदघाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन करण्यात आले.
शिबिरात नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष अजय चाडावार, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम धुमाळे, गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय मुरमुरे, पोलीस निरीक्षक मारोती थोरात, म.रा.शि.प.मुंबईचे राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, वनवासी कल्यान आश्रमचे जेष्ठ कार्यकर्ते गोवर्धनराव मुंडे, अनिरुद्र केंद्रे, माजी नगराध्यक्ष के.मूर्ती, दिनकर चाडावार, शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड, केंद्र प्रमुख रमेश राठोड, सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे संगमेश्वर नळगिरे, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, नगरसेवक शिवा आंधळे, गिरीश नेम्मानिवार यांची प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
श्री. गोळवलकर गुरुजी रक्तपेढी नांदेडचे महायोगदान असलेल्या रक्तदान शिबीराचे आयोजक शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष नरसिंग यंड्रलवार यांनी प्रास्ताविक व अमोल उत्तरवार यांनी सूत्रसंचालन केले. रवि नेम्मानिवार यांनी आभार मानले. वनवासी कल्याण आश्रमच्या गोवर्धन मुंडें आणि तहसीलदार नरेंद्र देशमूख यांच्या रक्तदानाने शिबीर सुरु झाले.
संतोष दासरवार, गजानन निळकंठवार, शिवराज मुंडे, सचिन चव्हाण, गोपाल कनाके, समशेर खान, रमेश आंधळे, करण एंड्रलवार, सुरेश माडपेल्लीवार, साई नेम्मानिवार, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी रविंद्र चौधरी, सदानंद अचुकलवार, संतोष पेटकुले, अविनाश दासरवार, विकास राठोड, गिरीश पत्की, प्रशांत कोरडवार, योगेश वैद्य, विवेक पेगर्लावार, सचिन कोंडापुलकलवार, ज्योतीबा बनसोडे, देवराव यंड्रलवार, चंद्रकांत नेम्मानिवार आदिंनी परिश्रम घेतले.
Friday 10 April 2020
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या रक्तदान शिबिरात १०० रक्तदात्यांनी केले रक्तदान
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment