लाॅकडाऊ च्या काळात गोकुंदा येथे रेती तस्करी जोमात;प्रशासनाचे दुर्लक्ष - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 10 April 2020

लाॅकडाऊ च्या काळात गोकुंदा येथे रेती तस्करी जोमात;प्रशासनाचे दुर्लक्ष


लाॅकडाऊ च्या काळात गोकुंदा येथे रेती तस्करी जोमात;प्रशासनाचे दुर्लक्ष


किनवट  : लाॅकडाऊनच्या काळात सुद्धा गोकुंदा (ता.किनवट) येथे विटा व चोरट्या रेतीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत खाली रेती आणि वर विटा भरुन तस्करी चालु आहे.
    लाॅकडाऊनच्या काळात कायद्याचे पालन सर्वसामान्य नागरिकांनी करायचे आणि राष्ट्रीय संपत्तिच्या चोरांनी मात्र सरकारी यंत्रणेला साक्षी ठेऊन कायद्याचे उलंघन करायचे, असाच काहीसा प्रकार गोकुंदा परिसरात  सर्रास  सुरु आहे.प्रशासन मात्र त्यांच्या मुसक्या आवळायला कमी पडत आहे,असे चित्र आहे.घर बांधकामावर सर्रास दहा-पाच मजूर काम करतात ती कामे थांबवा, अन्यथा कोरोनाचा फैलावाला हे कारणीभूत ठरु शकेल.यासाठी संबंधित प्रशासनाने त्यांना पायबंद करावा, अशी चिंताग्रस्त झालेल्या नागरिकांची मागणी आहे.
           कोरोना (कोव्हीड १९) च्या पार्श्वभूमीवर सर्वदूर लाॅकडाऊन, संचारबंदी व विशेष म्हणजे जमावबंदी आदेश आहेत. नागरीकांकडून त्याचे अगदी पालनही केले जात आहे. नागरीकांनी आपले दायीत्व समजून कायद्याचे उलंघन केलेले दिसत नाही. मात्र , तालुका प्रशासन हे विट कारखान्यांसह रेती चोरट्यांवर अंकूश न लावता त्यांना लाॅकडाऊन मधून सूट देत आहेत की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. ज्यांनी कायद्याचे उलंघन केले त्यांच्यावर कार्यवाही केली जात नाही, असे एकूण चित्र दिसत आहे. परवाच गोकुंद्यातील ठाकरे चौकात खाली रेती व वर विटांनी भरलेले तीन ट्रॅक्टर आलेत. ट्रॅक्टरमधून पाणी गळत होते. महसूल विभागाच्या कर्मचा-यांनी ती आडवली आणि सोडूनही दिली.
दहा ते वीस कि.मी.वरुन ट्रॅक्टरची वाहतूक चालु आहे. याकडे    प्रशासनाने गठीत केलेले भरारी पथके. कानाडोळा करीत आहेत.   गोकुंद्यातील आयटीआय मधिल तहसील कार्यालयासमोरुन सर्रास विटांच्या ट्रॅक्टरांची रात्रंदिवस वर्दळ असते. चोरट्या रेतीचा उपसा व वाहतूक या बंदच्या काळातही चालुच आहे. आज (दि.१०) पहाटे चार वाजताचे दरम्यान जवळपास आकरा ट्रॅक्टर्स रेती आणि विटा वाहतांना दिसून आले. खरेतर विट कारखानदारांनी किती ब्राॅसची राॅयल्टी भरणा केला आहे? आणि प्रत्यक्षात किती विटांची विक्री केली ? यावर महसूल विभागाचे नियंत्रण असल्याचे दिसून येत नाही.
    मुळात गोकुंदा व किनवट शहरातील घर बांधकामे सक्तीने थांबवली पाहिजे. त्या बांधकामावर पंधरा ते वीस मजूर एक्कोप्याने काम करतांना दिसतात. त्यांना रोखवण्यास प्रशासन मात्र उदासिन दिसते. किनवट नगर परिषदेचे नगराध्यक्ष यांनी कोरोनाच्या काळात सक्रीय सहभाग घेतला. परंतु, बांधकामांवर लगाम लावलेला नाही. बांधकामे थांबल्यास सामाजिक आंतर, कायद्यांचे उलंघन होणार नाही. गोकुंदा ग्रामपंचायतला वालीच कोणी नाही. लावारीश कारभार असल्याने त्यांचा या महामारीच्या काळात कसलेही योगदान दिसत नाही. कोरोनाच्या काळात ठरावीक लोकांकडून कायद्याचे उलंघन केले जात असल्याचे चित्र आहे.

No comments:

Post a Comment

Pages