कोरोना प्रादुर्भावाचा ग्रामीण जनतेला गांभीर्य नाही
प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज
माहूर : कोरोणासारख्या रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पाहिजे त्या प्रमाणात ग्रामीण भागात गांभीर्य नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत असल्याने अश्या महाभयंकर रोगास आळा घालणे मोठे आव्हान सिद्ध होणार आहे. गेली पंधरा दिवस अख्खा देश स्तब्द झाला असताना देशातील, विदेशातील प्रवासी वाहतूक ठप्प झाली असली तरी मात्र आजही ग्रामीण भागात कोरोणा म्हणजे मनोरंजन असेच वाटत आहे. शासनाने लाॅकडाऊन करून सर्व प्रवास, कार्यालय, उद्योग, व्यापारपेठ बंद ठेवली असताना अगणित नुकसानीची पर्वा न करता ""नागरिकांची आरोग्य हीच आमची संपत्ती ""म्हणून सर्व बंद पाडली आहे. यामध्ये नागरिकास लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंना वगळली असल्याने याचाच फायदा घेत आज अनेक लोक रस्त्यावरती सैराट फिरताना दिसत आहे आज मितीस देशात या आजाराने चार हजाराचा आकडा पार केला असून महाराष्ट्र हजार पार होण्यास वेळ लागणार नाही .अशीच परिस्थिती राहिल्यास कितीतरी पटीने रुग्णाची संख्या वाढणार आहे. तेव्हा यास आळा घालणे कठीण होणार असल्याने वेळीच दखल घेण्याची गरज असून प्रशासनास कठोर पावले उचलावी लागणार आहे. सुदैवाने आपण यातून वंचित आहोत यात जिल्हा व तालुका प्रशासन ,पोलिस, आरोग्य, विद्युत वितरण ,जिल्हा परिषद व लोकप्रतिनिधीचे मोठे योगदान आहे आपल्या जिल्ह्याच्या चहु बाजूला येऊन ठेपलेला आजार आज तरी आत प्रवेश करू न शकलेला याचे खरे श्रेय जाते ती दिवरात्र नियोजन व परिश्रम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी बांधवांना. नांदेड जिल्ह्याच्या चारी बाजूस मग तो यवतमाळ जिल्हा असो हिंगोली, लातूर,आदिलाबाद असो वा निजामाबाद सारखी जिल्ह्यांमध्ये याचा शिरकाव झाला असताना आपण जरी दूर असलो तरी जर अशीच परिस्थिती राहिल्यास अशा महाभयंकर रोगाच्या विळख्यात येण्यास वेळ लागणार नसून एवढ्या दिवसांच्या मेहनंतीला ,त्यागाला ,जिद्दीला हरताळ फासला जाणार असल्याने ग्रामीण भागातील छोटे-मोठे व्यापारी ,टपरीधारक,अवैध दारू, गुटखा विक्रेते व विनाकारण मोटारसायकल वर फिरणारी तरुण मंडळी यास वेळीच आळा न घातल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही.तेव्हा प्रशासनानी कठोर व दंडातमक कारवाई करणे गरजेचे आहे. ग्राम पातळीवर समित्या नेमून त्या कार्यरत करावे लागेल अन्यथा वाईट वेळ येण्यास वेळ लागणार नाही.
Tuesday 7 April 2020
कोरोना प्रादुर्भावाचा ग्रामीण जनतेला गांभीर्य नाही प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment