डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त फुले शाहू आंबेडकर देगलूर शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 7 April 2020

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त फुले शाहू आंबेडकर देगलूर शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त फुले शाहू आंबेडकर देगलूर शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन


देगलुर :
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंती चे औचित्य साधून फुले-शाहु-आंबेडकर युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष स्वप्नील नरबाग व जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर तालुका शाखेच्या वतीने  दि.13 एप्रिल 2020 रोजी डॉ. आंबेडकर नगर येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
                    विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी संपूर्ण जगात उल्हासात साजरी करण्यात येते पण या वर्षी कोरोना या महारोगामुळे संपूर्ण जगात लॉकडाउन असल्या कारणाने राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपापल्या घरीच राहून जयंती साजरी करून महामानवाला अभिवादन करावे असे सांगण्यात आले आहे.त्यांच अनुशंगाने फुले-शाहु-आंबेडकर युवा मंच देगलूर चे तालुकाध्यक्ष पवन सावंत व नगरसेवक अजय वानखेडे यांच्या वतीने कोरोना महामारीमध्ये रक्ताचा पुरवठा कमी असल्या कारणाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.तरि देगलूर तालुक्यातील व शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून मोलाचे सहकार्य करावे असे आवाहन डॉ. आंबेडकर नगर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages