बार्टीने दिला बेघर गरजुना मदतिचा हात -महासंचालक कैलास कणसे यांचा पुढाकार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 2 April 2020

बार्टीने दिला बेघर गरजुना मदतिचा हात -महासंचालक कैलास कणसे यांचा पुढाकार

बार्टीने दिला बेघर गरजुना मदतिचा हात                                                    -महासंचालक कैलास कणसे यांचा पुढाकार      

       

पुणे  :   कोरोणा विषाणुच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण जग आज मोठ्या संकटात सापडले आहे.  आपल्या देशात या कोरोणाने  मोठा कहर केला आहे.महाराष्ट्रात सुध्दा मोठ्या प्रमाणात कोरोणाचे लागण झालेले रूग आढळुन आल्याने कोरोणाला रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार विविध उपाय योजना आखत आहे.


    दिनांक २१ मार्च ते १४ एप्रिल प्रर्यंत संपूर्ण देशात संचार बंदी लाॅकड़ाऊन केले आहे. पुणे शहरात सुध्दा लाॅकड़ाऊन  असल्यामुळे हातावर पोट आसणारे गोर गरिब ,मजुर बिघारी कामगार, रस्त्याच्या लगत आसणारे बेघर ,भिक्षेकरी, कचरा वेचणारे कामगार, लहान बालके, निराधार बालके ,यांना याचा मोठा फटका बसला आहे. या लोकांचे प्रंचड़ हाल होत आहेत.या बेघराना मदतिचा हात देण्यासाठी ड़ाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेचे महासंचालक कैलास कणसे (भा.पो.से.) यांनी पुढाकार घेतला आहे. या भुकेल्याना भोजन व पिण्याचे पाणी मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला.दिनांक २९ मार्च ते १४ एप्रिल पर्यंत दररोज पुणे शहरातील गरजु  ७०० लोकांना भोजन व पिण्याचे पाणी बाटल वाटप करण्यात येत आहे.
   बार्टीचे निंबधक यादव गायकवाड  याच्या हस्ते या गरजुंना भोजन (फुड पॅकेटस) व पाणी बाटल वाटप करण्यात येत आहे. महासंचालक कैलास कणसे यांनी दिनांक १  एप्रिल  रोजी प्रत्यक्ष भोजन वाटप केले व याचा आढावा घेतला.या वेळी भिक्षेकरी,पुणे स्टेशन परिसरातील बेघर ,बालके,वृद्ध, पारधी समाजातिल रस्त्यावरील बेघर,नंदीबैल समाजातिल गरिब कुटुंबे, सफाई कामगार,स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विघ्यार्थी, पुणे शहरातील विविध भागातील गरजुंना  भोजन वाटप करण्यात आले.
  भोजनाचा नमुना तपासणे ,स्वच्छ व आरोग्याची काळजी घेणे, हॅन्ड़ ग्लोज मास्कचा वापर करून भोजन वाटप, गाडीचे निर्जतुकिकरण करून सुरक्षेची काळजी घेण्यात येत आहे. निबंधक यादव गायकवाड यांच्या देखरेखीखाली प्रंकल्पसंचालक भीमराव पारखे, नितिन सहारे, आरती ड़ोळस ,परदेशी,प्रशांत बुध्दीवंत ,डी. टी. पी. आॅपरेटर दर्शन सकट, सुरक्षा आधिकारी ढमाले, आदी भोजन वाटप करत आहेत. बार्टीच्या या उपक्रमाचे बेघर गरजु लोकांनी कौतुक केले.पुढिल परिस्थिती पाहुन या उपक्रमांची व्याप्ती वाढवणार असुन गोर गरिब बेघराना मदतिचा हात देऊन बार्टी ड़ाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना १४ एप्रिल रोजी   अभिवादन करणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Pages