डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समारोह समीती तर्फे गरजुंना अन्नधान्याचे वाटप
नागपूर : नरेंद्र नगर पुल, चंद्रमणि नगर, झाँसी रानी चौक, नंदनवन परिसरातिल १९ कटुंबाना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समारोह समिती द्वारे आतापर्यंत २५ अत्यंत गरीब व गरजू कुटुंबियांना राशन देण्यात आले. समिती चे कार्यकर्ते नागपुरातील विविध वस्त्यांमध्ये अश्या गरजू कुटुंबांची माहिती काढून त्यांच्या पर्यंत ही मदत पोहचवीत आहेत. देशभरात संपूर्ण बंदी असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल बेहाल होत आहे. त्यातही जे मजूर रोजंदारी वर असतात, घरघुती काम करणाऱ्या मोलकरणी, छोट्या दुकानात काम करणारे मजूर, रस्त्यावर राहणारे अशे कित्येक परिवार अतिशय आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अश्यातच ही समिती आपण समाजचे काही देणे लागतो, (pay back to society) या तत्वावर काम करीत आहे. अश्या गरजू लोकांसाठी समाजबांधव ची भावना ठेवून झटत आहे. एका कुटुंबाला ५किलो तांदूळ, ४ किलो गव्हाचे पीठ, १ किलो डाळ, १ किलो तेल, हळद, मीठ, मिरची पावडर अश्या वस्तू घरी पोहचवत आहेत. अश्या परिस्थिती मध्ये देखील आम्हा लोकांचा विचार करणारे ही या समाजात आहे ही कृतध्न्यता व्यक्त करून लोक भारावून गेली आहेत.
या सोबतच काही इतर संघटना ज्या नागपूर मध्ये अश्याच प्रकारचे कार्य करीत आहे. त्यांनाही आर्थिक मदत समिती द्वारे करण्यात आली ज्यात `प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्था`, `फील गूड फौंडेशन`, खूप लढलो बेकिने आता लढूया एकिने, इत्यादी संघटनांचा समावेश आहे. समितीचा एकमात्र उद्देश आहे की अश्या कठीण परिस्थिती मध्ये आपल्या शहरातील जे गोर गरीब लोक आहेत ते उपाशीपोटी नको राहायला. ही आम्हा सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. हा उपक्रम राबवत असताना लोकांना कोरोना रोगा बद्दल आवश्यक ती माहिती व खबरदारीचे मार्गदर्शन ही कार्यकर्ते करीत आहेत, सोबतच मास्क सुद्धा वाटत आहेत. हा उपक्रम पुढे ही काही दिवस सुरु राहणार आहे.
Thursday 2 April 2020
Home
प्रादेशिक
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समारोह समीती तर्फे गरजुंना अन्नधान्याचे वाटप
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समारोह समीती तर्फे गरजुंना अन्नधान्याचे वाटप
Tags
# प्रादेशिक
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
प्रादेशिक
Labels:
प्रादेशिक
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment