भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म14 एप्रिल 1891ला मध्यप्रदेशमधील महू या गावी झाला.त्यांच्या आईचे नाव भीमाबाई आंबेडकरआणि वडिलांचे नाव रामजी आंबेडकर होते. अनेक समस्यांचा सामना करून त्यांनी आपले जीवन घडवले. आंबेडकरांच्या जन्माच्या4वर्षानंतर त्यांच्या आईचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आंबेडकरचा सांभाळ आत्या मीराबाईने केला. आंबेडकरांना घडविण्यात त्यांच्या आत्याचा खूप मोलाचा वाटा आहे.दलित कुटुंबात जन्माला आल्यामुळे त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.दलित असल्यामुळे त्यांना शिक्षण, पाणी, बोलणे, चालणे यावर बंदी होती लोकांच्या अशा वागणुकीमुळे त्यांना विचार करायला भाग पाडले. आंबेडकरांचे वडील सुभेदार असल्यामुळे त्यांच्यावर शिस्तीचा चांगलाच प्रभाव होता. सामाजिक विषमतेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनावर बालपणीच वाईट अनुभव कोरले गेले.
दलित लोकांच्या मनात आंबेडकरांनी एक वेगळीच जागा निर्माण केली होती, आंबेडकरांच्या विचारांनी दलित लोकांना विचार करायला भाग पाडले आणि आपले जीवन जगण्यास नवीन प्रेरणा दिली. दलितांच्या प्रति अनेक प्रयत्न करुन त्यांना सन्मानाचे जीवन दिले म्हणून बाबासाहेबांना दलितांचे कैवारी म्हणतात. दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकर दिवस रात्र झटत होते.दलितांचे जीवन सुधारण्यासाठी आंबेडकरांनी खूप कष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्त्रीमुक्तीचे समर्थक होते. महिलांना आणि दलितांना अधिकार प्राप्त करून दिले.1942च्या नागपुरातील महिला परिषदेत स्त्रिया मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, स्त्रियांनी आपले हक्क स्वतः लढून घ्यायला हवे असे त्यांना वाटे. बाबासाहेबांनी भारतीय स्त्रियांसाठी अनेक कार्य केले आहेत. औरंगाबादला त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली आणि इथे मुलींनाही प्रवेश दिला.1906साली दापोलीच्या 9 वर्षांच्या रमाबाईसोबत बाबासाहेबांचे लग्न झाले. रमाबाईंनी आंबेडकरांना आपल्या संसाररूपी जीवनात खूप साथ दिली.इ.स.1923साली बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले होते,त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती, अनेकानी त्यांची मदत करू पाहिली पण स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी जिद्दीने दुःखाशी, अडचणींशी, गरिबीशी भांडत होती प्रदीर्घ आजाराने27मे1935रोजी रमाई ची प्राणज्योत मावळली. बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले होते.
देशाच्या हितासाठी प्रत्येक अपमान सहन करून एक नवीन विचारसरणीला जन्म दिला होता.आंबेडकरांचा जीवन प्रवास हा खूपच संघर्षमय होता तरी पण त्यांनी कधीच हार मानली नाही दलितांना दिलेल्या प्रत्येक वाचनाला पूर्ण करून दाखवले आहे.आंबेडकरांच्या मनावर बुद्धांच्या शिकवणीचा ,महात्मा फुलेच्या कार्याचा प्रभाव आणि संत कबीर या महापुरुषांच्या तत्वावर श्रद्धा होती प्रज्ञा, शील,करुणा आणि मैत्री यानुसार आपले चरित्र घडवावे असे वाटे. बाबासाहेबांना ग्रंथ वाचण्याचे प्रचंड वेड होते.
1927चा महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह,1930चा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह केला.1956साली बाबासाहेबांनी नागपूरच्या भूमीवर बौध्द धर्म स्वीकारला व दलितांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. दलितांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता म्हणून आंबेडकरांनी चवदर तळे खुले करून दिले.
बाबासाहेबांनी मूनायक(१९२०),बहिष्कृत भारत(१९२७),जनता(१९३०),प्रबुद्ध भारत(१९५६)अशी वृतपत्रे चालवली. या वृत्तपत्रातून अस्पृशांची प्रश्न मांडले.'शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही' असे बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणाविषयक मत होते.'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा'ही शिकवण दलितांना दिली. शिक्षण घेऊन केवळ नोकरी न करता समाजाचा उद्गार करण्यासाठी झटावे असे म्हणत असे. शिक्षणापासून दलितांनी वंचित राहू नये अशी बाबासाहेबांची इच्छा होती.
आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे पूर्ण झाले. एलफिन्स्टन हायस्कूलमधून त्यांची मॅट्रिक झाली. अस्पृश्यता निर्मुलनासाठी आपले जीवन व्यस्थित केले. बाबासाहेबांच्या शिक्षणाची जिद्द पाहात बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी अमेरिकेतील शिक्षणासाठी२५ रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली. बाबासाहेब आंबेडकरांना १९५२साली कोलंबिया युनिव्हर्सिटीने'डॉक्टर ऑफ लॉज'ही पदवी सन्मानित केली. बाबासाहेबांनी सामाजिक, आर्थिक,राजनीतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, औद्योगिक, साहित्यिक, संविधानिक अशा अनेक क्षेत्रात कार्य केले. आपल्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी मोलाचे योगदान दिले. बाबासाहेबांचे अनेक पैलू आहेत त्यामध्ये पत्रकारिता हा त्यांचा महत्वाचा तसेच वाखान्या जोगा पैलू आहे.प्राध्यापक आणि पत्रकार हे दोन देशाच्या निर्मिती साठी महत्वाची भूमिका बजावतात.
वास्तविक चर्चा करण्यासाठी वृतपत्रशिवाय दुसरा योग्य मार्ग नाही असे ते म्हणत. त्यावेळी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ पाहिजे,असे बाबासाहेबांचे मत होते आंबेडकरांनी महात्मा गांधींचे प्राण वाचविण्यासाठी पुणे करारावर मोठ्या दिलदारपणे स्वाक्षरी केली होती.
बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहचावे म्हणून अनेक शाहिरांनी जनजागृती केली. बाबासाहेबांना चित्रकलेची आवड होती. बाबसाहेबांसारख्या निळ्या वादळाने माणसाना माणसासारखे जगण्यास शिकवले.बाबसाहेबांसारखे अर्थशास्त्र आणि राजकीय नेता होणार नाही.
६डिसेंबर१९५६ रोजी या महामानवाने जगाचा निरोप घेतला.त्यावेळी सर्व बहुजन समाज आक्रोश करून रडू लागला.१९९०साली बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.भारतासाठी तसेच दलितांसाठी केलेल्या महान कार्यांना कधीच विसरता येणार नाही.
धनश्री सुगावकर-वागरे मुबंई
सं.क्र. ९०९६००४५९७
No comments:
Post a Comment