आता एपीएल ( केशरी ) शिधापत्रिका धारकांनाही सवलतीच्या दरात अन्नधान्य -तहसीलदार नरेंद्र देशमुख - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 13 April 2020

आता एपीएल ( केशरी ) शिधापत्रिका धारकांनाही सवलतीच्या दरात अन्नधान्य -तहसीलदार नरेंद्र देशमुख

किनवट : आता एपीएल ( केशरी ) शिधापत्रिका धारकांना माहे मे व जून या दोन महिन्याच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार असल्याचे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
      आपल्या देशातील नोव्हेल कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एपीएल ( केशरी ) मधील ज्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत तसेच शेतकरी योजने अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळत नाही , अशा एपीएल ( केशरी ) मधील लाभार्थ्यांना माहे मे व जून या दोन महिन्याच्या कालावधीकरिता सवलती दराने अन्नधान्यचा लाभ देण्याबाबत शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे.
            एपीएल ( केशरी ) मधील सदर लाभार्थ्यांना गहू रु ८ / - प्रतिकिलो व व तांदूळ १२ / - प्रतिकिलो या दराने प्रतिमाह प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ या प्रमाणे ५ किलो अन्नधान्य माहे में व जून या दोन महिन्याच्या कालावधी करिता वितरीत करण्यात येणार आहे . 
            ज्या एपीएल ( केशरी ) मधील शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे . त्या शिधापत्रिका धारकांच्या नोंदी संगकीय प्रणालीवर झाल्या नसतील अथवा त्या शिधापत्रिकांचे आधार सीडिंग झाली नसेल , तरी त्या शिधापत्रिकाधारकांना या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या दराने व परिमाणात अन्नधान्य देण्यात येणार आहे, असेही तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Pages