मोफत तांदळाचे स्वस्त धान्य दुकानातून उद्यापासून वाटप सुरु होणार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 13 April 2020

मोफत तांदळाचे स्वस्त धान्य दुकानातून उद्यापासून वाटप सुरु होणार


किनवट: किनवट गोदामाला जोडलेल्या ७९ स्वस्त धान्य दुकानापैकी १५ दुकानातून मंगळवारपासून (ता.१४) प्रती व्यक्ति ५ किलो मोफत तांदूळाचे वाटप करण्यात येणार आहे.ही योजना शेतकरी लाभार्थी वगळून अंत्योंदय व प्राधान्यक्रम योजनेसाठीच  लागू आहे. लाभार्थ्यांनी सामाजिक अंतर पाळून मोफत तांदूळ योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन अखिल भारतीय रास्त भाव दुकानदार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस एम.यु. सर्पे यांनी केले आहे.
     इस्लापूर गोदामाला जोडलेल्या ६७ रास्त भाव दुकानदारांपैकी  २५ दुकानदारांना काल(दि.१२)मोफत तांदूळाचे वितरण करण्यात आले आहे.रास्त भाव दुकानदारांनी त्याचे वाटपही लाभार्थ्यांना सुरु केले आहे.
लाभार्थ्यांच्या कुठल्याही तक्रारी प्रशासनाकडे न येऊ देता सुरळीत वाटप करावे, अशी विनंतीही सर्पे यांनी केली आहे. 
    तालुक्यातील उर्वरीत गावात गोदामातून तांदळाचे जसे - जसे वितरण होईल तसे- तसे रास्त भाव दुकानातून मोफत तांदळाचे वाटप करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages